शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवणार कांद्याच्या दरात मोठी घसरण

शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवणार कांद्याच्या दरात मोठी घसरण

कांदा पुन्हा शेतकऱ्यांना रडवणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. गेल्या आठवडय़ात कांद्याच्या दरात मोठी घसरण झाली आहे. कधी चार हजारांच्या जवळपास असणारे कांद्याचे दर आता 1800 रुपयांच्या आत आले आहेत. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला आहे. कांद्याच्या दरातील घसरण रोखली गेली नाही तर शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघणे अवघड होणार आहे.

कांदा निर्यातीवरील 20 टक्के निर्यात शुल्क केंद्र सरकारने लावले आहे. शेतकरी आणि शेतकरी संघटनांकडून हे उत्पादन शुल्क हटवण्याची मागणी अनेक महिन्यांपासून केली जात आहे, परंतु केंद्र सरकारने त्यावर निर्णय घेतला नाही. त्यामुळे निर्यात होणारा कांदा विदेशात महाग जात आहे. आता कांदा मोठय़ा प्रमाणावर बाजारात येत आहे. बाजार समित्यांमध्ये दररोज एक ते दीड लाख क्विंटल कांद्याची आवक होत आहे. शेतकऱ्यांचा शेतातील कांदा मार्केटमध्ये विक्रीसाठी येत असल्याने कांद्याच्या बाजारभावात साडेसातशे रुपयांची मोठी घसरण झाली आहे. आता कांद्याचे सरासरी बाजारभाव 1800 रुपयांच्या आत आले आहे. कांद्याला 1750 रुपये इतका सरासरी बाजारभाव मिळत आहे. कांद्याच्या दरात अशीच घसरण सुरू राहिल्यास भविष्यात कांद्याचा उत्पादन खर्चही निघणार नाही असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. दरात होणाऱया घसरणीच्या भीतीमुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;