हेलिकॉप्टरमधून करा कुंभमेळय़ाचे दर्शन

हेलिकॉप्टरमधून करा कुंभमेळय़ाचे दर्शन

महाकुंभमेळ्यासाठी विविध सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. यामध्ये हेलिकॉप्टर सेवेचाही समावेश आहे. सात मिनिटं आसमंतात राहून हेलिकॉप्टरमधून कुंभमेळ्याचे दर्शन करता येईल. देश-विदेशातून येणाऱ्या भाविकांच्या सुविधेचा विचार करता या वर्षी संगम दर्शनासाठी हेलिकॉप्टर सेवा सुरू होणार आहे. त्यासाठी तीन हजार रुपये शुल्क आकारले जाईल. पवनहंस हेलिकॉप्टर लिमिटेड सर्व्हिसेसच्या मदतीने ही सेवा 12 ते 28 जानेवारीपर्यंत उपलब्ध असेल. ऑनलाइन, ऑफलाइन पद्धतीने बुकिंग करता येईल. महाकुंभमेळ्यातील हेलिपॅडवर दोन हेलिकॉप्टर असतील. त्यामधून एका वेळी 4 ते 5 भाविक प्रवास करू शकतील. सात मिनिटांमध्ये संगम दर्शनासह अन्य धार्मिक स्थळांचेही दर्शन करता येईल. गंगा-यमुनेच्या संगमाचे विहंगम दृश्य हवाई सफरीतून पाहता येईल.

महाकुंभला जाणाऱ्यांसाठी 59 रुपयांत ’महाकुंभ विमा’

महाकुंभला रेल्वेने जाणाऱ्या प्रवाशांना सुरक्षा कवच देण्यासाठी विशेष ‘महाकुंभ विमा’ सुरू करण्यात आला आहे. हा विमा 59 रुपयांना खरेदी करता येणार आहे. यामध्ये वैद्यकीय खर्चासह बॅगांच्या नुकसानभरपाईपर्यंत सामाविष्ट आहे. फोनपेने ही सुविधा खासकरून महाकुंभ यात्रेकरूंसाठी सुरू केली आहे. फोनपेने यासाठी आयसीआयसीआय लोम्बार्डसोबत करार केला आहे. धार्मिक यात्रेसाठी जात असलेल्या प्रवाशांचे संभावित धोक्यापासून संरक्षण करता यावे हा यामागील हेतू आहे. केवळ रेल्वेच नाही, तर कंपनी बस प्रवाशांनादेखील विमा सुविधा पुरवत आहे. विमानाने जाणाऱ्या प्रवाशांनाही विमा सुरक्षा आहे. मात्र, त्याचे प्रीमियम 99 रुपयांचे असल्याचे वृत्त आहे. या विमा योजनेची वैधता 13 जानेवारी ते 25 फेब्रुवारीपर्यंत असेल. दरम्यान, 59 आणि 99 रुपयांचा विमा घेतल्यास विविध बाबतीत सुरक्षा मिळणार आहे. इस्पितळात दाखल केल्यास 50,000 रुपयांपर्यंत मदत केली जाईल.  ऐनवेळी यात्रेकरूला जाता न आल्यासही त्याला 5,000 रुपयांपर्यंत कॅन्सलेशन कव्हर मिळेल. यासाठी फोन पेवर इन्शुरन्स सेक्शनमध्ये महाकुंभ इन्शुरन्सवर क्लिक करून माहिती मिळवता येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;