आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार

आता ते शिव्या देत आहेत, जनता निवडणुकीत त्यांना उत्तर देणार; केजरीवाल यांचा अमित शहांवर पलटवार

दिल्ली विधानसभा निवडणूक जवळ येत असल्याने राजधानी दिल्लीत राजकीय वातावरण तापत आहे. आप आणि भाजपमध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. तसेच काँग्रसही या निवडणुकीत असल्याने त्यांच्याकडूनही आप आणि भाजपवर आरोप करण्यात येत आहेत. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आपचे संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी पुन्हा एकदा भाजपवर निशाणा साधत अमित शहा यांच्यावर पलटवार केला आहे.

अमित शहा यांनी शनिवारी भाषणादरम्यान दिल्लीतील नागरिकांना, झोपडपट्टीवासीयांना शिव्या दिल्या. त्यांनी आपल्यावरही आरोप केले. अमित शहा सातत्याने आपल्याला आणि दिल्लीवासीयांना शिव्या देत आहेत. जनता याचे उत्तर त्यांना निवडणुकीत देईल, असे केजरीवाल म्हणाले. अमित शहा यांनी भाषणादरम्यान फक्त खोटे आणि खोटेच पुढे रेटले आहे. आपण रविवारी पत्रकार परिषद घेणार असून त्यांचा खोट्याचा पर्दाफाश करणार असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

अमित शहा आता झोपडपट्टीवासीयांना आश्वासने देत आहेत. मात्र, याच झोपड्या निवडणुकीनंतर तोडण्याचा त्यांचा डाव आहे. आपण पुराव्यानिशी भाजपचा कुटील डाव उघड करणार असल्याचेही केजरीवाल यांनी स्पष्ट केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;