रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल

रविवारी बायकोकडे पाहण्याच्या विधानावरून सुब्रमण्यन झाले ट्रोल

इन्फोसिसचे सह-संस्थापक नारायण मूर्ती यांनी आठवडय़ातून 70 तास काम करण्याची सूचना केल्यानंतर आता लार्सन अँड टुब्रो (एल अँड टी) चे चेअरमन एसएन सुब्रमण्यन यांनी त्यांच्यापुढे जात आठवडय़ातून विमान 90 तास काम करावे, असा अजब सल्ला दिल्यानंतर सोशल मीडियावर अनेकांनी त्यांना ट्रोल केले आहे. अभिनेत्री दीपिका पादुकोण, उद्योगपती हर्ष गोयंका, बॅडमिंटनपटू ज्वाला गुट्टा यांच्यासह अनेकांनी पुढे येत या विधानाचा खरपूस समाचार घेतला. रविवारी सुट्टीच्या दिवशी बायकोकडे किती वेळ एकटक पाहत राहणार, त्यापेक्षा बॅग उचला आणि कामाला जा, असा सल्ला एसएन सुब्रमण्यन यांनी दिला आहे. पत्रकारांशी संवाद साधताना सुब्रमण्यन यांना विचारण्यात आले की, तुमची अब्जावधी डॉलरची कंपनी आपल्या कर्मचाऱ्यांना शनिवारीही का बोलावते? यावर उत्तर देताना ते म्हणाले की, मला माफ करा की मी तुम्हाला रविवारी काम करायला लावू शकलो नाही. जर मी तुम्हाला रविवारीही काम करायला लावू शकलो तर मला जास्त आनंद होईल, असे म्हटले आहे.

काय म्हणाले होते

आठवडय़ातील रविवारच्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही घरी बसून काय करता? तुम्ही तुमच्या बायकोकडे किती वेळ एकटक बघू शकता? तुमची बायको तुमच्याकडे किती वेळ बघू शकते? चला, ऑफिसला जा आणि कामाला लागा, मी स्वत: रविवारी काम करतो, असे सुब्रमण्यम म्हणाले. सुब्रमण्यन यांचे हे वक्तव्य  रेडिटवर शेअर करण्यात आले होते, ज्यामध्ये अनेक युजर्सनी त्यांच्या वक्तव्यावर असहमत असल्याची भावना व्यक्त केली आहे. अंतर्गत बैठकीचा हा व्हिडिओ कधीचा आहे, याबाबत कोणतीही माहिती नाही.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;