अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमध्ये धक्कदायक प्रकार, टीटीई आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला मारहाण

अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमध्ये धक्कदायक प्रकार, टीटीई आणि कोच अटेंडंटकडून प्रवाशाला मारहाण

लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांतील रेल्वेच्या उर्मट वर्तनाबाबत तक्रारी नोंद होत असतानाच अमृतसर-कटीहार एक्सप्रेसमधील धक्कादायक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या एक्सप्रेसमध्ये ड्युटीवर असलेल्या टीटीई आणि कोच अटेंडंटने एका प्रवाशाला पट्ट्याने बेदम मारहाण तसेच लाथा मारल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रवाशाला कोणत्या कारणातून मारहाण करण्यात आली हे अद्याप कळू शकले नाही.

धावत्या ट्रेनमध्ये हा संतापजनक प्रकार घडला. इतर प्रवाशांनी या घटनेचा व्हिडिओ बनवला असून तो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. रेल्वेच्या कर्मचार्‍यांच्या अशा वर्तनावरुन प्रवाशांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न ऐरणीवर आला आहे.

कोच अटेंडंट प्रवाशाला पट्ट्याने मारहाण करत आहे तर टीटीईने त्याला जमिनीवर दाबून ठेवल्याचे व्हिडिओत दिसत आहे. दुसऱ्या क्लिपमध्ये टीटीई प्रवाशाला बुटाने मारहाण करत आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. टीटीई आणि कोच अटेंडंटवर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;