पुढच्या मोर्चात कराड-मुंडेंची प्रॉपर्टी जाहीर करणार – सुरेश धस

पुढच्या मोर्चात कराड-मुंडेंची प्रॉपर्टी जाहीर करणार – सुरेश धस

संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाच्या विरोधात यापुढे मोर्चा असेल तिथे वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे यांची प्रॉपर्टी जाहीर करणार, असा इशारा आज आमदार सुरेश धस यांनी दिला. विधानसभा निवडणुकीत बबन गीते हा परळीतून उमेदवार होतोय की काय या भीतीपोटीच त्याला बापू आंधळे हत्या प्रकरणात गुंतवून त्याचा काटा काढला, असा आरोप त्यांनी केला.

आकांना वरच्या आकांचा फुल सपोर्ट

“मी धनजंय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नाही. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश सोळंके यांनी तशी मागणी केली आहे. मी आका आणि आकांचे आका म्हणत होतो. पण मी आता स्पष्टपणे बोलतोय, मी धनंजय मुंडेंचा राजीनामा मागितलेला नाही. त्यांचा राजीनामा घेणे कोणाच्या हातात आहे?’’ असा प्रतिसवालही सुरेश धस यांनी केला.

माझाही सीडीआर काढा

संतोष देशमुख यांच्या हत्येच्या दोन दिवस आधी धस यांनी वाल्मीक कराडला पह्न केला होता, धस यांचाही सीडीआर तपासा असे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी म्हटले होते. त्याबद्दल बोलताना धस यांनी, माझाही सीडीआर तपासा, तपासलाच पाहिजे. मी कराडला कशासाठी पह्न केला होता ते समोर येईल, असे स्पष्ट केले.

मुंडे-कराड पैसे बुडवणाऱ्यांच्या बाजूने

बँकाबाबत आरोप करताना सुरेश धस यांनी खाडे नावाच्या पोलीस अधिकाऱयाचेही नाव घेतले. खाडेच्या घरात दीड कोटी रुपये सापडले होते. त्या खाडेला वाचवायला वाल्मीक कराड पुढे होता, असे धस म्हणाले. पैसे बुडवण्याच्या प्रकरणांमध्ये खातेदारांच्या पाठीशी उभे राहण्याऐवजी वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे हे दोघेही पैसे बुडवणाऱयांच्या बाजूने राहिले. कराड हा चोरांचा, दरोडेखोरांचा साथीदार आहे, असे सुरेश धस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;