लग्नात डिजे-दारू नसल्यास 21 हजारांचे बक्षीस

लग्नात डिजे-दारू नसल्यास 21 हजारांचे बक्षीस

पंजाबमधील भटिंडा जिह्यातील बल्ले गावाने अनोख निर्णय घेतलाय. गावात लग्न समारंभात  डिजे वाजवला नाही आणि दारू दिली नाही, तर ग्रामपंचायतीतर्फे 21 हजारांची रोख रक्कम बक्षीस दिले जाणार आहे. याबाबत माहिती देताना बल्लो गावच्या सरपंच अमरजीत कौर यांनी सांगितले की, गावकऱ्यांनी लग्न समारंभात पैशांची उधळपट्टी करू नये आणि दारूचा गैरवापर थांबावा यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

लग्नसमारंभात जिथे दारू दिली जाते, तिथे वातावरण बिघडते आणि काही वेळा मारामारीही होते असे दिसते. ते पुढे म्हणाले की, लग्नसमारंभात डीजे वाजवला जातो. त्यावरूनही वाद होतो. जेणेकरून लोकांचे आर्थिक नुकसान होणार नाही असे सरपंच अमरजीत कौर म्हणाले. पंचायतीने ठराव केला आहे, ज्यानुसार लग्न समारंभात कोणत्याही कुटुंबाने दारू ठेवली नाही आणि डीजे वाजवला नाही तर त्याला 21 हजार रुपये दिले जातील. बल्लोळ गावाची लोकसंख्या 5 हजार आहे, जिथे हा प्रस्ताव लागू करण्यात आला आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;