तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली

तोपर्यंत शासकीय मदत घेणार नाही, सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांनी 10 लाखांची शासकीय मदत नाकारली

परभणी हिंसाचार प्रकरणात पोलीस कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांना शासनाच्या वतीने  10 लाखांची मदत देण्यात अली होती. मात्र त्यांच्या कुटुंबीयांनी ही मदत नाकारल्याचे बातमी समोर येत आहे. सोमनाथ सूर्यवंशी यांच्या कुटुंबीयांचं म्हणणं आहे की, सोमनाथ यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या आरोप पोलिसांवर कारवाई होत नाही, तोपर्यंत शासकीय मदत स्वीकारणार नाही.

दरम्यान, परभणीमध्ये 10 डिसेंबर रोजी संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करण्यात आल्याची घटना घडली होती. यामुळे संतप्त नागरिकांनी 11 डिसेंबरला जिल्हा बंदची हाक दिली होती. या बंददरम्यान जाळपोळ व दगडफेकीच्या घटना घडल्या होत्या. त्यावेळी अटक केलेल्यांपैकी सोमनाथ सूर्यवंशी यांचा न्यायालयीन कोठडीत मृत्यू झाला होता. पोलिसांनी केलेल्या मारहाणीमुळेच सोमनाथ यांचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;