महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून लष्करातील जवानाने जीवन संपवले

महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून लष्करातील जवानाने जीवन संपवले

जम्मू कश्मीर येथे तैनात असलेल्या जवानाने एका महिलेच्या ब्लॅकमेलिंगला कंटाळून आत्महत्या केली आहे. कृष्ण कुमार यादव असे त्या जवानाचे नाव असून त्याने स्वत:वर गोळ्या झाडून आपले आयुष्य संपवले. यादवला एक तरुणी गेल्या काही दिवसांपासून ब्लॅकमेल करत होती व त्याचे पैसे लुटत होती. त्या जाचाला कंटाळून कृष्णकुमारने स्वत:चे आयुष्य संपवले. कृष्णकुमारने एक सुसाईड नोट लिहून त्याच्यासोबत घडत असलेला प्रकार सांगितला,

कृष्णकुमार हा मूळचा राजस्थानमधील जयपूरच्या अमरसर गावचा रहिवासी होता. दोन वर्षांपूर्वी तो सुट्टीवर असताना सिकर जिल्ह्यातील जिनमाता भागात गेला होता. तिथे काही लोकांनी त्याला ड्रग्ज दिले व त्याचे एका महिलेसोबतचे आक्षेपार्ह अवस्थेत फोटो व व्हिडीओ काढले. नंतर त्याच फोटो व व्हिडीओ च्या आधारे त्या महिलेने दोन वर्षांपासून कृष्णकुमारकडून 15 लाख उकळले होते. त्यामुळे कृष्णकुमार त्रासला होता.

लष्करातील काही नियमांमुळे त्याला पोलीस तक्रारही करता येत नव्हती. त्यामुळे या प्रकारातून आपली सुटका होणार नाही असे कृष्णकुमारला वाटत होते. या सर्व प्रकाराने नैराश्यात गेलेल्या कृष्णकुमारने 4 जानेवारीला स्वत:कडील बंदूकीने स्वत:वर गोळ्या झाडल्या. कृष्णकुमार याच्या पालकांनी जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत त्याच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करणार नसल्याचे जाहीर केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;