धक्कादायक! आठ वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

धक्कादायक! आठ वर्षाच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू

बंगळुरुमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका आठ वर्षांच्या मुलीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला आहे. वर्गात शिक्षिकेला वही दाखवत असताना अचानक खाली कोसळली आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने सर्व ठिकाणी हळहळ व्यक्त केली जात आहे.

बंगळुरुपासून 175 किमी असलेल्या चामराज नगर तालुक्यातील बदानुप्पे गावातील ही घटना आहे. तेजस्विनी (8) असे मुलीचे नाव असून श्रुती लिंगराजू असे तिच्या आईचे नाव आहे. ही घटना घडली त्यावेळी ती शाळेत होती. ती शिक्षकेला वही दाखवत असतानाच अचानक खाली कोसळली. तिला तत्काळ जेएसएस रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र त्याआधीच डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिले आहे. या घटनेने तिच्या शिक्षकांसह सर्वांनाच धक्का बसलेला असून मुलीच्या कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे..

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;