हिटलरशाहीविरोधात पत्रकाराने उभे राहावे, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचे आवाहन

हिटलरशाहीविरोधात पत्रकाराने उभे राहावे, ज्येष्ठ पत्रकार महावीर जोंधळे यांचे आवाहन

हिटलरशाहीच्या कालखंडाचा पत्रकारांनी अभ्यास करायला हवा, अन्यथा ही आग आपल्यापर्यंत कधी येईल सांगता येत नाही. दमन, दडपशाहीविरोधात पत्रकारांनी उभे राहायला हवे, असे आवाहन ज्येष्ठ पत्रकार आणि साहित्यिक महावीर जोंधळे यांनी सोमवारी मुंबई मराठी पत्रकार संघात पत्रकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात केले.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन सोहळय़ात पत्रकारितेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल विविध पत्रकारांना ज्येष्ट पत्रकार महावीर जोंधळे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. यावेळी निवडणूक अंदाज स्पर्धेतील विजेते तसेच छायाचित्र स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. तसेच विजेत्या छायाचित्रकारांच्या छायाचित्रांच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले. देशभरातील परिस्थितीमुळे सर्वसामान्य माणूस भयाकूल आहे. भय कोणत्या मार्गाने आपल्यापर्यंत येईल हे सांगता येत नाही. त्यावर मात करण्यासाठी मानवता वाढवणे, जपणे गरजेचे आहे; अन्यथा आपला इस्र्यल होईल, अशी भीतीही जोंधळे यांनी व्यक्त केली. यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण, कार्यवाह शैलेंद्र शिर्पे, उपाध्यक्ष स्वाती घोसाळकर, राजेंद्र हुंजे आणि कार्यकारिणी सदस्य व विश्वस्त उपस्थित होते.

मुंबई मराठी पत्रकार संघाच्या पुरस्कारांचे वितरण

महावीर जोंधळे यांच्या हस्ते दै. ‘सामना’चे वरिष्ठ वार्ताहर मंगेश मोरे, घनःशाम भडेकर, सचिन लुंगसे, विनोद राऊत आणि पांडुरंग म्हस्के यांना मुंबई मराठी पत्रकारसंघाच्या विविध पुरस्कारांनी गौरविण्यात आले. तसेच निवडणूक निकाल अंदाज स्पर्धेतील विजेते नंदू धुरंधर, संजीव उपरे, छायाचित्र स्पर्धेचे संयोजक अंशुमन पोयरेकर यांचाही सन्मान करण्यात आला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;