शिरूरच्या शास्ताबाद येथे बिबट्यांचा शेळ्या-मेंढ्यांच्या तळावर हल्ला, 7 शेळ्या मेंढ्या ठार 

शिरूरच्या शास्ताबाद येथे बिबट्यांचा शेळ्या-मेंढ्यांच्या तळावर हल्ला, 7 शेळ्या मेंढ्या ठार 

शिरूर तालुक्याच्या पश्चिमेकडील शास्ताबाद येथील शेतात असणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांच्या तळावर सोमवारी पहाटेच्या सुमारास बिबट्यांनी हल्ला चढवला. या हल्ल्यात लहान मोठ्या 7 शेळ्या-मेंढ्या ठार, तर रावडेवाडी येथे आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास बिबट्याने केलेल्या हल्ल्यात एक मोठी पाळीव घोडी ठार झाल्याची माहिती वनकर्मचारी हनुमंत कारकूड यांनी दिली.

शास्ताबाद येथे शेतकरी चंद्रकांत गोरडे यांचा शेळ्या मेंढ्याचा वाडा आहे. शेतीला जोडधंदा म्हणून ते पशुपालन व्यवसाय करतात. शेतात त्यांनी शेळ्या मेंढ्यासाठी मोठी जाळी तयार केली आहे. त्यांनी रविवारी दि. 5 ला सायंकाळी आठ वाजण्याच्या सुमारास नेहमीप्रमाणे जाळी बंद केली व शेतातून घरी परतले. दरम्यान, पहाटेच्या सुमारास बिबट्यांनी जाळीवरून आत प्रवेश करून शेळ्या मेंढ्यावर हल्ला चढवला. यावेळी बिबट्याने लहान मोठ्या 7 शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. शेतकरी चंद्रकांत गोरडे हे आज सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास शेतात गेले असता, हा प्रकार उघडकीस आला. या घटनेत त्यांचे जवळपास 2 लाखांपेक्षा जास्त नुकसान झाले आहे. या घटनेत इतर अनेक शेळयांना गंभीर इजा झाली असल्याने नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती वनविभागाला दिल्या नंतर वनरक्षक गणेश पवार, वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी घटनास्थळी पाहणी करून पंचनामा केला. या घटनेमुळे परिसरात बिबट्याची मोठ्या प्रमाणात दहशत पसरली आहे. वन विभागाने संबंधित शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी. तसेच सदर बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

पुरावा नसल्याने वन विभागाकडून 7 शेळ्या मेंढ्यांचाच पंचनामा

शेतकरी चंद्रकांत गोरडे यांनी सांगितल्याप्रमाणे बिबट्याने जवळपास लहान मोठ्या 15 शेळ्या मेंढ्यांचा फडशा पाडला. त्यामुळे वनविभागाने 15 शेळ्या मेंढ्यांची नुकसान भरपाई देण्याची मागणी त्यांनी केली. परंतु लहान शेळ्या बिबट्याने फस्त केल्याने पुरावा आढळून आला नसल्याने, वन विभागाकडून केवळ 7 शेळ्या मेंढ्यांचा पंचनामा केला असल्याचे वन कर्मचारी हनुमंत कारकूड यांनी सांगितले.तर येथे दोन बिबट्यांनी हल्ला केला असण्याची शक्यता कारकूड यांनी व्यक्त केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;