Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : धनश्रीने नॅशनल टीव्हीवर केला चहलचा अपमान ?

Dhanashree Verma And Yuzvendra Chahal : धनश्रीने नॅशनल टीव्हीवर केला चहलचा अपमान ?

डिसेंबर 2020 मध्ये धनश्री वर्मा आणि युझवेंद्र चहल यांचे लग्न झाले. मात्र आता तब्बल चार वर्षांनंतर ते विभक्त झाल्याच्या अफवा समोर येत आहेत. दोघांनी इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे. त्यांच लग्न झालं तेव्हा धनश्री वर्मा फारशी प्रसिद्ध नव्हती, तर युजवेंद्र प्रसिद्ध क्रिकेटपटू होता. पण आता 4 वर्षांत परिस्थिती बरीच बदलली आहे, धनश्रीने खूप प्रगति केली असून ती एक वेलनोन नाव आहे. म्यूझिक व्हिडीओ, डान्स शो आणि फिल्म्स.. धनश्रीचं नाव अनेक मोठमोठ्या प्रोजेक्ट्मध्ये घेतलं जातंय. त्यांच्या घटस्फोटाबद्दल अफवा पसरताच अनेक चर्चा सुरू असून आता एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. धनश्रीने युजवेंद्रचा अपमान केल्याचा आरोप फराह खानने त्यामध्ये केला होता.

खरंतर या व्हिडीओवरून धनश्री वर्माला खूप ट्रोलही करण्यात आलं. सोशल मीडियावर जे व्हायरल झालं ती एक छोटीशी क्लिप आहे. यामध्ये युजवेंद्र चहलने एका गेमदरम्यान धनश्री वर्माला प्रश्न विचारला असता, त्याचा प्रश्न ऐकल्यानंतर सर्वजण म्हणाले, की तू त्याचा इतका अपमान केला आहेस.

धनश्रीने केला चहलचा अपमान ?

हा व्हिडिओ ‘झलक दिखला जा 11’ मधील आहे. खरं सांगायचं झालं तर, या सीझनमध्ये धनश्री वर्मा वाइल्ड कार्ड स्पर्धक म्हणून दाखल झाली होती. त्यावेळी, फायनलपूर्वी फॅमिली वीक झाला, तेव्हा युजवेंद्र चहलही शोमध्ये धनश्रीला सपोर्ट करण्यासाठी आला होता. यावेळी शोमध्ये एक गेसिंग गेम खेळण्यात आला. तिथे युजवेंद्र चहलला ॲक्शन करून धनश्रीला दाखवायचं होतं की तो कसा डान्स करतो.त्याने तिला विचारलं लग्नापूर्वी मी कसा नाचायचो ? मात्र त्यावर धनश्रीने जे उत्तर दिलं ते ऐकून सगळे चकित झाले – नॉन डान्सर, बॅड डान्सर, ऑफ बीट. पण त्याचं खरं उत्तर होतं की – टपोरी डान्स. आणि त्यानंतरच फराह खान धनश्रीला म्हणाली – तू तर त्याचा खूप अपमान केला आहेस,पण तिचं हे बोलणं मजेतच होतं.

पुढल्यावेळी धनश्रीला ॲक्टिंग करून योग्य शब्द सांगायचा होता. बोर्डावर ब्युटिफूल असा शब्द लिहीला होता. त्यावर धनश्रीने चहलला विचारलं की – तू काय विचार करून मला प्रपोज केलंस, मी कशी आहे ? त्यावर चहलने योग्य उत्तर ( ब्युटिफूल – सुंदर) दिल होतं. मात्र ते ऐकून फराहने पुन्हा मजा केली. धनश्री एक गोष्ट लक्षात ठेव, त्याचा ( चहल) अपमान केला जातोय पण तुझं कौतुक होतंय.हाच जुना व्हिडीओ आता व्हायरल झाला असून त्यातील कमेंट सेक्शनमध्ये धनश्रीला ट्रोल केलं जात आहे.

त्या गेममध्ये ती युझवेंद्र चहलची मस्करी करत होती. फराह खान देखील विनोदानेच इनस्ट हा शपब्द वापरला. पण लोकांनी ते गंभीरतेने घेतलं असून आता धनश्रीलाच ट्रोल करण्यास सुरुवात केली. धनश्री वर्मा लवकरच साऊथमध्ये पदार्पण करणार आहे अशा चर्चाही काही काळापासून सुरू होत्या.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;