पुढचे दिवस इलेक्ट्रिक वाहनांचे; ग्राहकांची वाढती पसंती

पुढचे दिवस इलेक्ट्रिक वाहनांचे; ग्राहकांची वाढती पसंती

हिंदुस्थानात पुढचे दिवस हे इलेक्ट्रिक वाहनांचे असणार आहेत. देशात पेट्रोल आणि डिझेल वाहनांच्या तुलनेत इलेक्ट्रिक वाहनांना ग्राहकांची पसंती मिळत आहे. तसेच पेट्रोल आणि डिझेलच्या दराने शंभरी पार केली आहे. ग्राहकांचा कल लक्षात घेऊन केंद्र सरकार हिंदुस्थानात 72 हजार 300 चार्जिंग स्टेशन्स बांधणार आहेत. इलेक्ट्रिक वाहने चार्ज करण्यासाठी सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी आवश्यक असलेल्या पायाभूत सुविधांवर केंद्र सरकारने 80 टक्के सबसिडी जाहीर केली आहे. काही प्रकरणांमध्ये ही सबसिडी 100 टक्क्यांपर्यंत असू शकते. केंद्र सरकार या योजनेवर येत्या दोन वर्षांत 10 हजार 900 कोटी रुपये खर्च करणार आहे.

 चार्जिंग स्टेशन्स कशी असतील

60 किलोवॅट वेगवान चार्जरसह किमान एक इलेक्ट्रिक 4-व्हीलर आणि 12 किलोवॅटचे किमान दोन इलेक्ट्रिक टू आणि तीन चाकी चार्जर आवश्यक आहे. त्यासाठी किमान 40 ते 60 चौरस मीटर जागा लागणार आहे. यात दोन कार, चार दुचाकी किंवा तीनचाकी वाहनांसाठी पार्किंगची जागा आवश्यक आहे.

देशभरात 72,300 नवे चार्जिंग स्टेशन्स, काय आहे योजना?

या प्रस्तावित सार्वजनिक जलद चार्जिंग स्टेशनमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी वाहन आणि तीन चाकी वाहनांसाठी 48,400 आणि चारचाकी वाहनांसाठी 22,100 स्टेशन्स समाविष्ट आहेत. कारव्यतिरिक्त, यामध्ये हलकी व्यावसायिक वाहने आणि रुग्णवाहिका यांचासुद्धा समावेश आहे. इलेक्ट्रिक बस आणि ट्रकसाठी 1,800 चार्जरदेखील असतील, असे ठरवण्यात आले आहेत. सर्वात आधी मुंबई, बंगळुरू, दिल्लीपाटणा आणि उदयपूर यांसारख्या टियर-2 आणि टियर-1 शहरांचा समावेश आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;