कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे हक्क द्यावेत, ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे प्रतिपादन

कंत्राटी कामगारांना कायद्याप्रमाणे हक्क द्यावेत, ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे प्रतिपादन

कंत्राटी कामगारांना किमान वेतन मिळाल्याशिवाय त्यांचे जगणे सुसह्य होणार नाही. त्यामुळे कर्नाटकाप्रमाणे महाराष्ट्रातील नगरपालिका कंत्राटी कामगारांना सरकारने कायद्याप्रमाणे त्यांचे हक्क द्यावेत. तसेच शासनाने कामगारांचा सन्मान करावा, असे प्रतिपादन ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष कॉ. उदय भट यांनी केले आहे.

कॉ. अतुल दिघे यांचा अध्यक्षतेखाली सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नगरपालिका कंत्राटी कामगारांची ‘सन्मान परिषद’ वागदे येथील गोपूरी आश्रम येथे रविवारी झाली. यावेळी ते बोलत होते.

कामगारांनी सकाळी 11 वाजता कणकवली बस स्थानकाजवळील बौद्धविहार येथे एकत्र येत बुद्धवंदना केली. तसेच बुद्धांच्या प्रतिमेला कॉ.शांताराम पाटील व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कॉ. धोंडीबा कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला स्वागताध्यक्ष पल्लव कदम, बाबू बरागडे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून कामगारांची सन्मान रॅली निघाली.

‘कंत्राटी कामगाराना सन्मान मिळालाच पाहिजे, किमान वेतन मिळालेच पाहिजे, कंत्राटी कामगारांना कायम करा, ई. एस. आय. चा लाभ मिळालाच पाहिजे, कामगारांचा पगार महिन्याच्या 5 तारखेच्या आत झालाच पाहिजे, नगरपालिकेतील रिक्त पदांची भरती करा, अशा घोषणा देत रॅली छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांजवळ आली. त्याठिकाणी ऑल इंडिया म्युनसिपल वर्कर्स फेडरेशनचे अध्यक्ष व पुणे महानगरपालिका कामगार युनियन (मान्यताप्राप्त) चे अध्यक्ष कॉ. उदय भट
व कार्याध्यक्ष कॉ. नरसिंगे यांच्या हस्ते पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
त्यानंतर गोपुरी आश्रमात रॅली आली.

गोपुरी आश्रमात झालेल्या सन्मानपरिषदेत नगर‌पालिका कंत्राटी कामगारांना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच विविध ठराव मंजूर करण्यात आले. या परिषदेला जगन्नाथ केळूसकर, प्रवीण यादव, भूषण यादव, स्नेहा कदम, दशमी लाड, सचिन कदम, शिवराम जाधव, ऋत्वेश माड‌गूळ यांच्यासह जिल्ह्यातील बहुसंख्य कंत्राटी कामगार बंधू भगिनी उपस्थित होत्या.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;