तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी

तिरुपतीमध्ये भक्तांच्या समूहाला रुग्णवाहिकेची धडक, दोन महिलांचा मृत्यू; तीन जखमी

तिरुपतीमध्ये तिरुमला मंदिरात दर्शनासाठी चाललेल्या भाविकांच्या समूहाला 108 रुग्णवाहिकेने धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दोन महिलांचा मत्यू झाला असून तीन जण जखमी झाले. चंद्रगिरी मंडळातील नरसिंगपुरमजवळ सोमवारी ही घटना घडली. अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. दाट धुक्यामुळे अपघात घडला असावा असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पेड्डा रेडड्म्मा (40) आणि लक्षमम्मा (45) अशी मृत महिलांची नावे आहेत. तीन जखमी यात्रेकरूंना उपचारासाठी तिरुपती येथील रुईया रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मयत महिला अन्नमय जिल्ह्यातील रामापुरम मंडळातील चंपालापल्ली गावातील रहिवासी आहेत.

भक्तांचा समूह पुंगनूरहून भगवान व्यंकटेश्वराच्या तिरुमला मंदिराकडे चालला होता. यावेळी मदनपल्ले येथून तिरुपतीला रुग्ण घेऊन चाललेली रुग्णवाहिका भक्तांना धडकली. याप्रकरणी चंद्रगिरी पोलिसात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;