पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने अभिनेत्रीला लावला चुना

पैसे दुप्पट करण्याच्या आमिषाने अभिनेत्रीला लावला चुना

पैसे डबल करून देतो असे सांगून सिने अभिनेत्रीची फसवणूक केली आहे. याप्रकरणी 11 जणांविरोधात मालाड पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. फसवणुकीची रक्कम सुमारे 2 कोटी 76 लाख रुपये आहे. हा आकडा वाढण्याची शक्यता आहे. तक्रारदार या अभिनेत्री असून त्या मालाड येथे राहतात. 2017 मध्ये त्याची काही जणांशी ओळख झाली होती. ओळखीदरम्यान त्याने अभिनेत्रीला एका ऍग्रो कंपनीबाबत माहिती दिली होती. याच कंपनीत ते सर्वजण संचालक आणि वरिष्ठ अधिकारी म्हणून काम करत आहेत. जर कंपनीत गुंतवणूक केल्यास दहा महिनांत डबल पैसे देतो असे त्यांना आमिष दाखवले. त्याच्यावर विश्वास ठेवून अभिनेत्रीने काही रक्कम गुंतवली.

गुंतवणूक केल्यावर सुरुवातीला तिला चांगला परतावा मिळाला होता. त्यामुळे तिने कंपनीत आणखी गुंतवणूक केली होती. अभिनेत्रीने 1 कोटी 31 लाख रुपये गुंतवले. गुंतवणूक केल्यावर तिला काही कागदपत्रे पुरावा म्हणून देण्यात आले. सुरुवातीला तिला चांगला परतावा दिल्यानंतर तिला रक्कम देणे बंद केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;