यूपी-बिहारमध्ये थंडीचा कहर; 10 जणांचा मृत्यू

यूपी-बिहारमध्ये थंडीचा कहर; 10 जणांचा मृत्यू

जम्मू-कश्मीर आणि हिमाचल प्रदेशात झालेल्या तुफान बर्फवृष्टीमुळे संपूर्ण उत्तर हिंदुस्थानात थंडीने प्रचंड कहर केला आहे. थंडीच्या लाटेमुळे गेल्या 24 तासांत उत्तर प्रदेशात 8 आणि बिहारमध्ये 2 जणांना जीव गमवावा लागला. देशातील 14 राज्यांमध्ये सलग दुसऱ्या दिवशी दाट धुके पाहायला मिळत आहे. दिल्लीत शनिवारी 9 तास शून्य दृश्यमानतेची नोंद झाली. त्यामुळे विमान उड्डाणे तसेच 60 रेल्वेगाडय़ा उशिराने धावत होत्या. 3 आणि 4 जानेवारीला दिल्लीत 800 हून अधिक उड्डाणांना उशीर झाला. आज सकाळीही 160 उड्डाणे वेळापत्रकानुसार उडू शकली नाहीत. 3 दिवसांत 900 हून अधिक उड्डाणे प्रभावित झाली. राजस्थान, मध्य प्रदेशात थंडीपासून दिलासा मिळाला आहे.

  •  हिमाचलच्या अनेक जिह्यांमध्ये तुफान बर्फवृष्टी सुरू असून पारा घसरणार आहे
  •  हिमाचल, उत्तराखंड, पंजाब, हरयाणा आणि दिल्लीत विजांचा कडकडाट आणि जोरदार वाऱ्याचा इशारा देण्यात आला आहे.
  •  पंजाब, हरयाणा, पश्चिम बंगाल, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरामध्ये दाट धुके राहणार आहे.
Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;