मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे जखमी

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात, दोघांचा मृत्यू; दोघे जखमी

चालकाचे नियंत्रण सुटल्याने मुंबई-अहमदाबाद महामार्गावर कारचा भीषण अपघात झाला. धानिवरीजवळ रविवारी दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना कासा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रमलाबेन आरीवाला आणि अमृतलाल घिवाला अशी मयतांची नावे आहेत.

सदर कार मुंबईहून गुजरातच्या दिशेने चालली होती. कारचा वेग अधिक असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि कार दोन-तीन वेळा उलटून खड्ड्यात कोसळली. यात कार चालक आणि त्याची पत्नी गंभीर जखमी झाले आहेत. तर मागच्या सीटवर बसलेल्या वृद्ध व्यक्तींचा मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;