महाकुंभ मेळ्यात बॉम्बस्फोटाची धमकी देणारा नासिर पठान निघाला आयुष कुमार जयस्वाल

महाकुंभ मेळ्यात बॉम्बस्फोटाची धमकी देणारा नासिर पठान निघाला आयुष कुमार जयस्वाल

महाकुंभ मेळ्यात बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणाऱ्या एका तरुणाला उत्तर प्रदेश पोलिसांनी बिहारमधील पूर्णिया जिल्ह्यातून अटक केली आहे. या तरुणाने नासिर पठाण या नावाने फेक सोशल मीडिया प्रोफाईल बनवून ही धमकी दिली होती. मात्र जेव्हा पोलिसांनी त्याला अटक केली तेव्हा त्याचं खरं नाव समजलं त्यांना धक्काच बसला. या तरुणाचं खरं नाव आयुष कुमार जयस्वाल आहे.

आयुष कुमार हा पूर्णिया जिल्ह्यातील भवानीपूरातील शहीदगंज भागात आपल्या कुटुंबासोबत राहतो. आयुषने सोशल मीडियावर नासिर पठान नावाने एक फेक प्रोफाइल तयार केले होते. याच प्रोफाइल मार्फत त्याने 31 डिसेंबरला महाकुंभ मेळ्यात बॉम्ब ब्लास्ट करण्याची धमकी दिली होती. या धमकीनंतर पोलिसांना तपास सुरू केला व आयुष कुमारला अटक केली.

यावर्षी कुंभमेळा हा 13 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा होणार आहे.  मेळयाला देशविदेशातून 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेची 560 पेक्षा जास्त तिकीट काऊंटर असून त्यावर दररोज 10 लाख तिकीटांचे बुकींग होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेय.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;