लग्नाचे विधी सुरू असताना टॉयलेटचा केला बहाणा, पैसे-दागिने घेऊन फरार झाली नववधू

लग्नाचे विधी सुरू असताना टॉयलेटचा केला बहाणा,  पैसे-दागिने घेऊन फरार झाली नववधू

उत्तर प्रदेशच्या गोरखपूरमध्ये एक अनोखी घटना घडली आहे. लग्नाच्या विधींमध्ये टॉयलेटच्या बहाण्याने रोख रक्कम आणि दागिने घेऊन नववधू फरार झाली. हे लग्न जुळविण्यासाठी एका व्यक्तीने 30 रुपये घेऊन जमवले होते.

ही घटना उत्तरप्रदेशातील गोरखपूर येथील आहे. एका 40 वर्षीय शेतकऱ्याच्या पत्नीचे निधन झाल्याने तो दुसऱ्या लग्नासाठी वधूच्या शोधात होता. एका व्यक्तीने सुरेशकडून 30 हजार रुपये घेऊन त्याचे लग्न जुळवले. त्याने लग्नापूर्वीच होणाऱ्या पत्नीला साड्या, दागिने आणि लग्नाचा इतर खर्च दिला. त्यानंतर कुटुंबियांसोबत तो लग्न करण्यासाठी मंदिरात पोहोचला. तिथे नववधू तिच्या आईसोबत होती. लग्नाच्या विधी सुरु होताच नववधूने टॉटलेटला जाण्याचा बहाणा केला आणि पुन्हा परतलीच नाही. जाताना रोख रक्कम आणि दागिने घेऊन फरार झाली. त्याच दरम्यान तिची आईपण गायब झाली आहे.

नवरदेव माध्यमांशी बोलताना म्हणाला की, मी माझा संसार पुन्हा मार्गी लावण्यासाठी दुसऱ्या लग्नाचा निर्णय घेतला होता. मात्र सर्व काही लुटले आहे. याप्रकरणी गोरखपुरचे एसपी जितेंद्र कुमार म्हणाले की, याप्रकरणाची अद्याप कोणतीही तक्रार दाखल केलेली नाही. या घटनेची तक्रार आल्यास प्रकरणाची चौकशी करण्यात येईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;