ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला, आयटी बीटेकच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन गेमचा नाद जीवावर बेतला, आयटी बीटेकच्या विद्यार्थ्यानं उचललं टोकाचं पाऊल

ऑनलाईन गेमने तरुणाईला वेड लावले आहे. हेच वेड अनेकदा घातक ठरत आहे. या गेममुळे तरुणाई नको त्या मार्गाला जात आहे. अशीच एक घटना इंदूरमध्ये उघडकीस आली आहे. वडिलांनी फी साठी दिलेले पैसे ऑनलाईन गेममध्ये हरल्याने बीटेकच्या विद्यार्थ्याने नैराश्येतून जीवन संपवलं आहे. इंदूरच्या सिमरोल परिसरात आयआयटी कँपसमध्ये ही घटना घडली. रोहित असे मयत विद्यार्थ्याचे नाव आहे.

मूळचा तेलंगणातील रहिवासी असलेला रोहित इंदूरमध्ये आयआयटीत बीटेकच्या पहिल्या वर्षात शिकत होता. रोहितला ऑनलाईन गेमचे वेड होते. रोहितच्या वडिलांनी कॉलेजची फी भरण्यासाठी त्याला 40 हजार पाठवले होते. मात्र रोहितने ते पैसे ऑनलाईन सट्टेबाजीत गमावले. यामुळे कॉलेजची फी कशी भरायची असा प्रश्न होता. याचमुळे त्याने टोकाचे पाऊल उचलले.

रोहितने मोबाईलवर स्क्रीनसेव्हर ठेवला होता. त्यात त्याने आपण ऑनलाईन गेममध्ये फी चे पैसे हरल्याचे म्हटले आहे. तसेच मला ऑनलाईन सट्टा खेळण्याचा नाद लागला. सर्वांना अलविदा असे पुढे नमूद करत त्याने आई-वडिलांची माफी मागितली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;