कुंभमेळात जाणाऱ्या भाविकांना तिकीट बुकिंगसाठी क्युआर कोड जॅकेट्स

कुंभमेळात जाणाऱ्या भाविकांना तिकीट बुकिंगसाठी क्युआर कोड जॅकेट्स

जानेवारी महिन्यात प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळात जाणाऱ्या भाविकांना रेल्वेचे तिकीट सहज उपलब्ध व्हावे, म्हणून रेल्वे प्रशासनाने स्मार्ट डिजिटल पाऊल उचललंय. त्यानुसार, रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना क्युआर कोड असलेले ग्रीन जॅकेट दिले जाणार आहे. त्यामुळे भाविकांना क्युआर कोड स्कॅन करून युटीएस ऍप सहज डाऊनलोड करता येईल. या सुविधेमुळे तिकीटांसाठी रेल्वे स्थानकात मोठय़ा रांगा लावण्याची गरज पडणार नाही.  13 जानेवारी ते 15 फेब्रुवारी दरम्यान कुंभमेळा होणार आहे.  यावर्षी कुंभमेळयाला देशविदेशातून 40 कोटी भाविक येण्याचा अंदाज आहे. त्यांच्या सुविधेसाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. रेल्वेची 560 पेक्षा जास्त तिकीट काऊंटर असून त्यावर दररोज 10 लाख तिकीटांचे बुकींग होईल, अशी व्यवस्था करण्यात आलेय.

क्युआर कोड जॅकेटमुळ तिकीटांचे बुकींग झटपट होईल. भाविकांना कोणताही त्रास होणार नाही. भाविकांनी क्युआर कोड स्कॅन केल्यास त्यांना युटीएस ऍपवरून अनारक्षित डिजिटल तिकीट काढता येईल.  प्रवाशांचा वेळ वाचेल, रांगा लावण्याचे टेन्शन नसेल जेणेकरून प्रयागराजमधील रेल्वे स्टेशनवरची गर्दी कमी होईल.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;