नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं; 300 किलो फुलं आणि 5 हजार संत्र्यांचा वापर

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजलं; 300 किलो फुलं आणि 5 हजार संत्र्यांचा वापर

नववर्षानिमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात विविध फुलांची व संत्रा फळाची आकर्षक सजावट केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली.

श्री विठ्ठल गाभारा, श्री रुक्मिणी गाभारा व श्री संत नामदेव पायरी येथे झेंडू, शेवंती, तोरण, कामिनी इत्यादी 300 किलो फुलांचा व 5 हजार नग संत्रा फळांचा वापर करून मनमोहक व आकर्षक सजावट करण्यात आली आहे. सदरची सजावट विठ्ठल भक्त प्रदीपसिंह ठाकुर, पुणे यांनी सेवाभावी तत्त्वावर मोफत केली असून, सजावटीचे काम श्री. साई डेकोरेटर्स शिंदे ब्रदर्स पंढरपूर यांनी केले आहे. त्यासाठी सुमारे 20 कामगारांनी परिश्रम घेतले.

श्री. विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सेवा करण्याबाबत आळंदी (जि.पुणे) येथील प्रदिपसिंह ठाकुर परिवाराने मंदिर समितीकडे सन 2021 मध्ये इच्छा व्यक्त केली होती. तेव्हापासून म्हणजे मागील पाच वर्षापासून नववर्षी निमित्त मंदिरात सेवाभावी तत्त्वावर मोफत फुलांची आरास करून देत आहे.

दरम्यान, नववर्षा निमित्त भाविकांची दर्शन रांगेत व मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. मंदिर समिती मार्फत पुरेशा प्रमाणात सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, भाविकांची गर्दी विचारात घेऊन भाविकांचे भराभर दर्शन होण्याच्या दृष्टीने ऑनलाइन दर्शन पास बुकिंग व्यवस्था बंद ठेवण्यात आली आहे. तसेच व्हीआयपी दर्शनावर निर्बंध, पुजेची संख्या कमी करणे व इतर अनुषंगिक उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

महत्त्वाचे सण उत्सव, खास दिवस या निमित्ताने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात फुलांची आरास, सजावट केली जाते. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विठ्ठल रुक्मिणी मंदिर सजले असून, मंदिरात आकर्षक फळा-फुलांची आकर्षक सजावट करण्यात आल्याने, विठुरायाचे सावळे रूप अधिकच खुलून दिसत आहे.

इंद्रायणी नदी प्रदूषणाचा प्रश्न ऐरणीवर; निधीअभावी रखडला इंद्रायणी नदी सुधार प्रकल्प

नवीन वर्षाची सुरुवात श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या दर्शनाने व्हावी यासाठी हजारो भाविक श्री क्षेत्र पंढरपूरात दाखल झालेले आहेत. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शन रांगेत गर्दी केली असून, विठ्ठल रुक्मिणीमातेच्या नाम गजराने परिसर दुमदुमून गेला आहे. या सजावटीमुळे विठ्ठल रुक्मिणी मातेच्या मुर्तीसह गाभारा पाहून देखील भाविक अधिक समाधानी होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;