भारतीय जुमला पार्टी आयोजित वॉशिंग मशीन अवॉर्ड 2024 ! वाचा विजेत्यांची नावं…

भारतीय जुमला पार्टी आयोजित वॉशिंग मशीन अवॉर्ड 2024 ! वाचा विजेत्यांची नावं…

भाजप म्हणजे भारतीय जुमला पार्टी असून निवडणुकांवेळी भाजपकडून जुमलेबाजी करण्यात येते. तसेच कोणीही भ्रष्टाचारी त्याचा पक्ष सोडून भाजपमध्ये दाखल झाल्यास त्या नेत्याला भाजपच्या वॉशिंग मशीनमधून स्वच्छ करण्यात येते. यावरून शिवसेनेनं (उद्धव बाळासाहेब ठाकरे) भाजपवर जबरदस्त टीका केली आहे. याबाबतचा व्हिडीओ शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलवर पोस्ट करण्यात आला आहे.

पोस्ट केलेल्या व्हिडीओत भारतीय जुमला पार्टी आयोजित वॉशिंग मशीन अवॉर्ड 2024 असे असून त्यात विजेत्यांची नावेही घोषित करण्यात आली आहेत. यात विजेत्यांमध्ये पहिले नाव अजित पवार यांचे असून 70 हजार कोटी रोख आणि मानाचे उपमुख्यमंत्रीपद असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. यात दुसरे नाव अशोक चव्हाण यांचे असून आदर्श व्यक्तिमत्व प्रमाणपत्र असे पारितोषिकाचे स्वरुप आहे. पुढील नाव किरीट सोमय्या यांचे असून आयएनएस घोटाळ्यातून मुक्तता मिळाल्याचे 57 कोटींचे प्रमाणपत्र असं पारितोषिकाचे स्वरुप आहे. त्यानंतर प्रफुल्ल पटेल याचं नाव असून एअर इंडिया विमानासहित 840 कोटींची हवाई सफर असे पोरितोषिकाचे स्वरुप आहे. पुढील नाव रवींद्र वायकर यांचे असून 500 कोटींचा जोगेश्वरी येथील भूखंड मोफत असे पारितोषिकाचे स्वरुप आहे, असे या व्हिडीओत दाखवण्यात आले आहे.

ईडी, सीबीआयच्या कृपेने भ्रष्टाचाराचे डाग स्वच्छ करण्याची हमी देणारी एकमेव मशीन भाजप वॉशिंग मशीन, भेटूया पुढच्या वर्षी नव्या विजेत्यांसह! तोपर्यंत भ्रष्टाचार करत रहा! भाजपमध्ये जात रहा!, असे व्हिडीओत दाखवले आहे. या व्हिडीओची सोशल मिडीयावर चर्चा होत आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;