तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक;प्राजक्ता माळीकडून सुरेश धसांचे कौतुक

तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचे पाईक;प्राजक्ता माळीकडून सुरेश धसांचे कौतुक

आमदार सुरेश धसांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीबाबत केलेल्या काही वक्तव्यांवर प्राजक्ताने आक्षेप घेत पत्रकार परिषद घेतली होती. तसेच तिने या पत्रकार परिषदेत तिच्यावर झालेल्या आरोपांचं खंडण केलं होतं. एवढच नाही कर राग आणि संताप व्यक्त करत तिने सुरेश धस यांनी माफी मागावी अशी मागणीही केली होती. तसेच सुरेश धस यांना कायदेशीर कारवाईचा इशारा दिला होता.

सुरेश धसांनी माफी मागितल्यानंतर प्राजक्ताचाही यूटर्न

प्राजक्ताची ही पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आली होती. या प्रत्रकार परिषदेनंतरही धस त्यांच्या मतावर ठाम होते. त्यानी प्राजक्ताची माफी मागणार नाही हे स्पष्ट भाषेत सांगितलं होतं. मात्र यानंतर प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची रविवारी भेट घेतली. या भेटीनंतर आता आमदार सुरेश धस यांनी माघार घेतली असल्याचे समोर आले आहे.

WhatsApp-Video-2024-12-31-at-5.52.24-PM-1

सुरेश धसांनी प्राजक्ता माळीची माफी मागत या प्रकरणावर पडदा पडला असं स्पष्ट केलं आहे. त्यामुळे या नव्याने सुरू झालेल्या वादाला पूर्णविराम मिळाला असल्याचे दिसत आहे. कारण आता अभिनेत्री प्राजक्ताने देखील यूटर्न घेतला असून आता कोणतीही कारवाई करणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. याबाबत तिने एका व्हिडीओद्वारे सुरेश धस यांचे आभार मानले आहेत.

व्हिडीओद्वारे प्राजक्ताने सुरेश धसांचे मानले आभार

प्राजक्ताने व्हिडीओमध्ये म्हटलं आहे ” माननीय आमदार श्री सुरेश धस यांचे देखील मी मनापासून आभार मानते अत्यंत मोठ्या मनानं त्यांनी समस्त महिला वर्गाची माफी मागितली, दिलगिरी व्यक्त केली. दादा खूप खूप धन्यवाद. असं करून तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचे पाईक आहात हे दाखवून दिलं”

WhatsApp-Video-2024-12-31-at-5.52.25-PM

महाराष्ट्रासह फडणवीस अन् रुपाली चाकणकरांचे आभार मानले

पुढे प्राजक्ता म्हणाली,” तुम्हा सगळ्यांना माझा नम्रतापूर्वक नमस्कार सबंध महाराष्ट्र सैनिक सर्वप्रथम मनापासून आभार मानते पत्रकार परिषद घेतल्या क्षणापासून ते आत्तापर्यंत मी आणि माझे कुटुंबीयांना शेकडो फोन , कॉल मेसेजेस, सोशल मीडियावर मेसेज आले आहेत. महिलांच्या सन्मानासाठी समाजातल्या सर्व स्तरांमधून आवाज उठवला गेला पाठिंबा दिला गेला समर्थन दिले गेले त्यामुळे आम्हाला फार समाधान वाटलं खूप खूप धन्यवाद.”

अखेर वादावर पडदा

असं म्हणत प्राजक्ताने या व्हिडिओमध्ये अवघ्या महाराष्ट्राचे आभार मानले. तसेच तिने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचेही आभार मानले. आणि या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकते असंही तिने स्पष्ट केलं आहे.

सुरेश धस आणि प्राजक्ता माळी या दोघांनीही आपापली बाजू मांडत शेवटी या वादाला पूर्णविराम दिल्याचं पाहायला मिळत आहे. तसेच प्राजक्ताचा हा व्हिडीओ देखील सध्या प्रचंड चर्चेत आला आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांच्या समिश्र प्रतिक्रिया येताना दिसत आहेत.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;