वाल्मीक कराडला ताब्यात घेतल्यानंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती; वाचा काय म्हणाले…

वाल्मीक कराडला ताब्यात घेतल्यानंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी दिली मोठी माहिती; वाचा काय म्हणाले…

बीड जिल्ह्यातील केज पोलीस ठाण्यातील देशमुख हत्याप्रकरणात प्रमुख आरोपी असलेला वाल्मीक कराड हा मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास सीआयडी मुख्यालयात शरण आला आहे. त्याला पुण्यातील सीआयडी पथकाने ताब्यात घेतले आहे. त्याची प्राथमिक चौकशी केल्यानंतर सीआडी पथकासह त्याला पुढील तपासासाठी रवाना करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या बीडच्या सीआयडी पथकाच्या अधिकाऱ्यांकडे त्याला सोपवण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील योग्य ती कार्यवाही करण्यात येणार आहे, अशी माहिती सीआयडी अधिकाऱ्यांनी दिली.

बीडमधील मस्साजोग गावचे संरपंच संतोष देशमुख यांची हत्या केल्या प्रकरणी तसेच पवनचक्की खंडणी प्रकरणी फरार वाल्मीक कराड मंगळवारी सकाळी पोलिसांना शरण आला. पाषाण येथील सीआयडीच्या कार्यालयात त्याने आत्मसमर्पण केले. मात्र, तो शरण आल्यावर प्रसारमाध्यमांना गुंगारा देत त्याला मागच्या दाराने दुसऱ्या ठिकाणी नेण्यात आले आहे. त्याला सीआयडी ऑफीसमधून बाहेर काढल्याची माहितीही मिडीयाला देण्यात आली नाही. मात्र, त्यानंतर सीआयडी अधिकाऱ्यांनी प्रसारमाध्यमांना याबाबतची माहिती दिली.

मागील काही दिवसांपासून सीआयडीची 13 वेगवेगळी पथके कराडच्या मागावर होती. बीड जिल्ह्यातील मस्साजोग (ता. केज) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या अनुषंगाने वाल्मीक कराड, सुदर्शन घुलेसह चार फरार आरोपींच्या शोधासाठी सीआयडीची नऊ पथके आणि 150 पेक्षा जास्त अधिकारी, कर्मचारी नियुक्त केले आहेत. वाल्मीक कराडच्या शोधासाठी सीआयडीचे पथक शोधाशोध करत होते. मात्र, कराड सापडला नाही. अखेर मंगळवारी कराड हा स्वतः पोलिसांना शरण आला.

वाल्मीक कराडला सीआयडी पथकाने ताब्यात घेतल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. राज्यात गुंडांचे राज्य चालू देणार नाही. या प्रकरणातील दोषींना फासावर लटकवणारच, असे फडणवीस म्हणाले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;