आशा भोसलेंचा 91 व्या वर्षी एनर्जेटीक परफॉर्मन्स; ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स

आशा भोसलेंचा 91 व्या वर्षी एनर्जेटीक परफॉर्मन्स; ‘तौबा तौबा’ गाण्यावर जबरदस्त डान्स

दिग्गज गायिका आशा भोसले हे वयाच्या 91 व्या वर्षीसुद्धा लाइव्ह कॉनसर्ट करतात, अनेक कार्यक्रमांना हजेरी लावतात. मुळात म्हणजे त्यांचा आवाज या वयातही तेवढाच गोड आहे. आशा भोसले यांच्या या वयातही असलेल्या एनर्जीचं सर्वजन कौतुक करतात.

दरम्यान आशा भोसले यांचा एक व्हडीओ सध्या व्हायरल झाला आहे. ज्या व्हिडीओमध्ये वयाच्या 91 व्या वर्षीही आशा भोसले यांनी त्यांच्या दमदार परफॉर्मन्समुळे सर्वांना नाचायला भाग पाडल्याच दिसून येत आहे. दुबईत आयोजित संगीत कार्यक्रमात आशा भोसले यांनी ‘तौबा तौबा’ हे सुपरहिट गाणे गाऊन या गाण्याची हुक स्टेप सादर केली.

आशा भोसलेंंचा ‘तौबा तौबा’वरचा भन्नाट परफॉर्मन्स

आशा भोसले यांच्या शोचा हाच व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये, त्या एका हातात माईक घेऊन काळ्या बॉर्डरसह पांढऱ्या रंगाच्या साडीत स्टेजवर उभ्या आहेत. गायक करण औजलाचे गाणे गायल्यानंतर आशा भोसले यांनीही या गाण्याची हुक स्टेप केली.

‘तौबा तौबा’ हे गाणे करण औजलाने संगीतबद्ध केले आहे. यासोबतच त्यांनी या गाण्याला आवाजही दिला आहे. ‘तौबा तौबा’ हे विकी कौशल, तृप्ती डिमरी आणि एमी विर्क यांच्या ‘बॅड न्यूज’ चित्रपटामधील गाणे आहे. करण औजलाने याने आशा भोसले यांच्या या व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना हा एक अविस्मरणीय क्षण असल्याचं म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by KadaK FM (@kadakfm)

करण औजलाने शेअर केला व्हिडीओ

करणने त्याच्या इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत लिहिले, ‘संगीताची देवी आशा भोसले जी यांनी ‘तौबा तौबा’ गायले. एका छोट्या गावात वाढणाऱ्या मुलाने रचलेले गाणे. विशेष म्हणजे ज्या मुलाला संगीताची पार्श्वभूमी नाही. या गाण्याला केवळ चाहत्यांकडूनच नव्हे तर संगीत कलाकारांचेही खूप प्रेम मिळाले आहे, पण हा क्षण खरोखरच अविस्मरणीय आहे आणि तो मी कधीही विसरणार नाही. मी खरोखर धन्य आणि कृतज्ञ आहे. तुम्हाला असे सर्व ट्रॅक देत राहण्यासाठी आणि खूप आठवणी निर्माण करण्यासाठी हे मला खरोखर खूप प्रेरित झालो आहे.”

दुबईमध्ये होता लाइव्ह परफॉर्मन्स

असं म्हणत त्याने आशा भोसले यांचे आभार मानले तसेच त्याचे गाणे गायल्याबद्दल आनंदही व्यक्त केला आहे.  तसंच पुढे तो  म्हणाला ‘मी तौबा तौबा गाणे वयाच्या 27  व्या वर्षी लिहिले आणि आशाजी यांनी वयाच्या 91 व्या वर्षी माझ्यापेक्षा चांगले गायले.

आशा भोसले आणि सोनू निगम यांनी रविवारी दुबईमध्ये लाइव्ह परफॉर्मन्ससाठी एकत्र आले. सोनू निगम आणि आशा भोसले यांचा दुबईतील कोका-कोला एरिना येथे कॉन्सर्ट आयोजित करण्यात आलं होतं.

 

 

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;