संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 10 मुलांवर मधमाशांचा हल्ला, तिघांवर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या 10 मुलांवर मधमाशांचा हल्ला, तिघांवर क्रिटीकेअर रुग्णालयात उपचार सुरू

येऊर येथील संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात ट्रेकिंगसाठी गेलेल्या मुलांवर मधमाशांनी हल्ला केल्याची घटना आज घडली. या घटनेची माहिती मिळताच वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी व टीडीआरएफ जवान आणि महापालिकेच्या आपत्ती विभागाने घटनास्थळी धाव घेत अडकलेल्या मुलांचे सर्च ऑपरेशन सुरू केले. दरम्यान, या घटनेत सात जणांना त्यांच्या पाल्यांकडे सुपूर्द करण्यात आले असून तीन जणांवर ठाण्याच्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

ठाण्याच्या लगत असलेल्या येऊर येथे भागात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान आहे. या डोंगरावर आज दुपारच्या सुमारास दहा तरुण ट्रेकिंगसाठी गेले होते. जंगलात ते रस्ता चुकले आणि जवळपास 4 किलोमीटर ते चालत गेले. यावेळी त्यांच्यावर मधमाशांनी जोरदार हल्ला केला. मधमाशा चावल्याने ही मुले तिथेच अडकली होती, यापैकी एकाने वर्तकनगर पोलीस ठाण्यात फोन करून आम्हीं अडकलो असल्याची माहिती दिली. तेव्हा पोलिसांनी ताबडतोब सूत्रे हलवली. ठाणे महापालिकेची आपत्ती विभाग, टीडीआरएफ जवानाच्या टीमने डोंगराकडे कुच केली. त्यानंतर तब्बल दीड तासांच्या प्रयत्नांनंतर मुलांची सुखरूप सुटका करण्यात आल्याची माहिती ठाणे महापालिकेच्या आपत्ती विभागाने दिली.

परवानगी नसताना डोंगरात गेलेच कसे?

संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात अनेक जंगली प्राण्यांचा वावर असतो. या घनदाट जंगलात परवानगीशिवाय आत सोडले जात नाही. मग हे तरुण डोंगरात गेलेच कसे, याचा तपास वर्तक नगर पोलीस करीत आहेत. दरम्यान, ही मुले छुप्या मार्गाने जंगलात गेली असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून पोलीस या प्रकरणाचा अधिक शोध घेत आहेत.

डोंगरामध्ये अडकलेल्या मुलांची नावे

ऋषी घोसाळकर (18) चेंदणी कोळीवाडा, कोपरी, समर्थ मयेकर (18 ) घणसोली, प्रणव परब (18) – विक्रोळी, वरद बासा (18) – विक्रोळी, सोहम देशमुख (18) – वैशाली नगर, श्रीनगर, ठाणे, कुणाल पानमंद (18) – घाटकोपर, तन्मय नाईक (18) – मुलुंड, रोहन घरुड (18) – मुलुंड, अलोक यादव (18) – कळवा, आर्य यादव ( 18 ) – कांजूरमार्ग

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;