Chandrapur News – चंद्रपुरात पार पडली बॅलेट पेपरवर निवडणूक, 91 टक्के मतदारांचा EVM ला विरोध

Chandrapur News – चंद्रपुरात पार पडली बॅलेट पेपरवर निवडणूक, 91 टक्के मतदारांचा EVM ला विरोध

विधानसभा निवडणुकीच्या मतदान प्रक्रियेमध्ये घोटाळा झाल्याचा दावा करत बॅलेट पेपरवर मतदान घेण्यासाठी मारकडवाडी गाव एकवटले होते. पाहता पाहता देशभरात मारकडवाडी गावाची चर्चा सुरू झाली आणि बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे, ही मागणी जोर धरू लागली. याच पार्श्वभुमीवर चंद्रपुरात कृषी महोत्सवात बॅलेट पेपरवर मतदान प्रक्रिया पार पडली असून 91 टक्के मतदारांनी EVM ला विरोध दर्शवत बॅलेट पेपरच्या बाजूने मतदान केले आहे. जनतेच्या मनात आजही बॅलेट पेपरवरील विश्वास कायम असल्याने सर्व निवडणुका या बॅलेटवर घ्याव्यात, अशी आशा मतदारांनी मतदानाच्या माध्यमातून व्यक्त केली.

धनोजे कुणबी समाजाकडून तीन दिवशीय कृषी महोत्सवाचे आयोजन शहरातील चांदा क्लब ग्राउंड मध्ये करण्यात आले होते. तीन दिवस चाललेल्या या कृषी महोत्सवात ओबीसी सेवा संघ यांच्या संकल्पनेतून “आवाज जनतेचा” हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात आला. यामध्ये सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजे का? असा प्रश्न मतदारांपुढे ठेवण्यात आला व त्यानुसार मतदान प्रक्रिया पार पडली. तीन दिवस सूरू असलेल्या या मतदानाची मतमोजणी झाली व जनतेचा विश्वास बॅलेट पेपरवरच आहे हे सिद्ध झाले. या निवडणूक प्रक्रियेत निवडणूक अधिकारी म्हणून खुशाल काळे, प्रवीण एकोणकर यांनी कार्य केले. मतमोजणी अधिकारी म्हणून ऍड. विलास माथनकर, अनिकेत दुर्गे, वाल्मीक यांनी काम बघितलं.

मतमोजणी झाल्यानंतर उपस्थितांपुढे ऍड. पुरुषोत्तम सातपुते यांनी निवडणुकीचा निकाल जाहीर केला. ओबीसी सेवा संघाचे अध्यक्ष प्रा. अनिल डहाके यांचे या उपक्रमाबद्दल विविध स्तरातून कौतुक होत आहे. आवाज जनतेचा या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्हाभरातील मतदारांनी बॅलेटच्या बाजूनी कौल दिला. त्यामूळे यापूढे प्रत्येक गावात “आवाज जनतेचा” उपक्रम राबविण्यात येईल. बॅलेट पेपरवर निवडणुका झाल्या पाहिजे यासाठी जनआंदोलन करण्यात येईल.

सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर झाल्या पाहिजेत का? असा प्रश्न जनतेला विचारण्यात आला होता. त्यानुसार पुढील टक्केवारीमध्ये मतदान प्रक्रिया पार पडली.

एकूण मतदान – 5035
बॅलेट पेपरच्या बाजूने – 4614 (91.63%)
बॅलेट पेपरच्या विरोधात – 356 (7.07%)
नोटा – 38 (0.75%)
अवैध – 27 (0.55%)

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;