ज्वेलर्सला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखेकडून तीन आरोपींना अटक

ज्वेलर्सला जीवे ठार मारण्याचा प्रयत्न, गुन्हे शाखेकडून तीन आरोपींना अटक

शहरातील एका नामांकित ज्वेलर्सला खोट्या गुह्यात अडकवण्याचा प्रयत्न मुंबई पोलिसांनी हाणून पाडला. गुन्हे शाखेच्या युनिट-9 चे वरिष्ठ निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने तपास करून तिघांना अटक केली. प्रशांत कविता, निरंजन सुदर्शन गुप्ता आणि केतन पारेख अशी त्यांची नावे आहेत.

तक्रारदार हे चिराबाजार येथे राहतात. त्यांचे ज्वेलरी शॉप आहे. गेल्या महिन्यात दुपारी ते मोटरसायकलवरून जात होते. तेव्हा अज्ञात मोटरसायकलस्वाराने त्यांच्या मोटरसायकलला जाणूनबुजून धडक दिली. त्यात ते जखमी झाले होते. या प्रकरणी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी गुन्हा नोंद केला होता.

दोन दिवसांपूर्वी गुन्हे शाखेच्या युनिट-9 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दया नायक यांच्या पथकाने निरंजन गुप्ता आणि केतन पारीखला अटक केली होती. त्यांच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल, मॅगझीन आणि 9 जिवंत काडतुसे जप्त केली होती. त्याने ती शस्त्रे एका ज्वेलर्सच्या दुकानातून जप्त केली होती. केतन हा त्या दुकानात काम करत होता.

खोट्या गुह्यात अडकवण्यासाठी त्याने ती शस्त्रे दुकानात ठेवली होती. त्या दोघांनी प्रशांतच्या मदतीने तक्रारदार यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला. त्या दिवशी तक्रारदार यांचा अपघात झाला दाखवून त्यांच्यावर हल्ला केला. युनिट-9 च्या पथकाने प्रशांतला बोरिवली येथून अटक केली. प्रशांत हा दहिसर येथे फेरीवाला म्हणून काम करतो. त्याच्याकडून पोलिसांनी एक मोबाईल आणि मोटरसायकल जप्त केली आहे. त्याला पुढील कारवाईसाठी लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांकडे स्वाधीन केले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;