भाजप – जदयूत बिहारमध्ये तणाव; घाऊक बदल्या करून नितीशकुमार दिल्लीत, राजीनाम्याच्या चर्चांना वेग

भाजप – जदयूत बिहारमध्ये तणाव; घाऊक बदल्या करून नितीशकुमार दिल्लीत, राजीनाम्याच्या चर्चांना वेग

बिहारमध्ये भाजपचे सरकार असावे हे वाजपेयींचे स्वप्न होते आणि ते आम्ही पूर्ण करू शकतो, असे वक्तव्य उपमुख्यमंत्री विजय सिन्हा यांनी केल्यापासून भाजप आणि जदयूमध्ये तणाव निर्माण झाला असून मुख्यमंत्री नितीशकुमार दिल्लीत पोहोचले आहेत. त्यांच्या राजीनाम्याच्या चर्चा सुरू आहेत.

नितीशकुमार हे दिल्लीत दोन वेगवेगळय़ा कामांसाठी दिल्लीत पोहोचल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमांमधून येत आहेत. माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या निधनानंतर त्यांनी आपली प्रगती यात्रा थांबवली होती. मात्र आता ते 4 जानेवारीपासून प्रगती यात्रा सुरू करणार असून डॉ. मनमोहन सिंग यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठी ते दिल्लीत गेल्याचे सांगितले जात आहे.

सिन्हा यांना व्हायचे होते मुख्यमंत्री

भाजपचे आमदार आणि बिहारचे मुख्यमंत्री विजय कुमार सिन्हा यांनी मुख्यमंत्री होण्याची इच्छा व्यक्त केली होती, मात्र त्यानंतर त्यांनी आपल्या वक्तव्यावरून यू टर्न घेतला. दरम्यान, आरजेडीचे आमदार भाई वीरेंद्र यांनी नितीशकुमार यांना महाआघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. अशा स्थितीत नितीशकुमार यांचा दिल्ली दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. नितीशकुमार दिल्लीत एनडीए आघाडीच्या नेत्यांची तसेच भाजपच्या वरिष्ठ नेत्यांचीही भेट घेणार आहेत. यानंतर ते निवेदन जारी करू शकतात. दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही मुख्यमंत्री भाजपचाच असावा असे वक्तव्य केले होते. त्यानंतर बिहारमध्ये नितीशकुमार यांच्या समर्थनाचे पोस्टर्स जागोजागी लागले होते.

बिहारमध्ये पुन्हा एकदा आयपीएस अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर बदल्या करण्यात आल्या आहेत. तब्बल 62 आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या करण्यात आल्या. आकाश कुमार यांना पाटण्याचे एसएसपी तर पाटण्याचे एसएसपी राजीव मिश्रा यांना दहशतवादविरोधी पथकाचे पोलीस उपमहानिरीक्षक बनवण्यात आले. या बदल्यांची बिहारमध्ये चांगलीच चर्चा रंगली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;