तारापूर एमआयडीसीमध्ये परफ्युमच्या कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

तारापूर एमआयडीसीमध्ये परफ्युमच्या कंपनीला भीषण आग; सुदैवाने जीवितहानी टळली

बोईसरमधील तारापूर एमआयडीसीत परफ्युमच्या कंपनीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी घडली. परिसरात लांबच लांब आगीचे लोळ उठले आहेत. आगीची माहिती मिळताच अग्नीशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. अग्नीशमन दलाकडून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

तारापूर एमआयडीसीतील युके अ‍ॅरोमॅटिक अँड केमिकल्स या कारखान्याला आग लागली. रविवार असल्याने कामगारांना सुट्टी असल्याने मोठी जीवितहानी टळली. आग नेमकी कशामुळे लागली याबाबत अद्याप माहिती मिळू शकली नाही.

युके अ‍ॅरोमॅटिक अँड केमिकल्स या कंपनीला आधी आग लागली. बघता बघता आगीने रौद्र रुप धारण केले. आगीचा भडका वाढल्याने शेजारी असलेल्या श्री केमिकलमध्ये आग पसरली. स्थानिक प्रशासनही घटनास्थळी दाखल झाले आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;