नांदेडमध्ये श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रेला प्रारंभ, लाखो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

नांदेडमध्ये श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान यात्रेला प्रारंभ, लाखो भाविकांनी घेतले पालखीचे दर्शन

दक्षिण हिन्दुस्थानातील प्रसिद्ध असलेल्या श्रीक्षेत्र खंडोबा देवस्थान माळेगाव येथील यात्रेला आज देवस्वारीने प्रारंभ झाला. ‘येळकोट येळकोट जय मल्हार’ म्हणत बेलभंडार्‍याची उधळण करीत पारंपारीक पद्धतीने यात्रा सुरू झाली. यावेळी लाखो भाविकांनी पालखीचे दर्शन घेतले. खंडोबाच्या व मानकर्‍यांच्या पालखीचे शासकीय विश्रामगृहावर देवस्थान ट्रस्टच्या वतीने मानाचा फेटा, शाल, श्रीफळ व मानधन देवून स्वागत करण्यात आले.

देवस्थान कमिटीच्या वतीने पूजा करुन दुपारी पालखी पुजनानंतर देव स्वारी काढण्यात आली. यावेळी राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील, आ. प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहा नगरीचे माजी नगराध्यक्ष कल्याण सावकार सुर्यवंशी, हंसराज पाटील बोरगावकर, संजय कर्‍हाळे, राष्ट्रवादीचे मनोहर भोसीकर, माळेगावच्या सरपंच कमलबाई रुस्तुमराव धुळगंडे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य साहेबराव काळे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप माळोदे आदी उपस्थिती होते.

खंडोबा यात्रेत वाघ्या-मुरळी

उत्तम जागा पाहुनी मल्हारी देव नांदे गड जेजुरी उत्तराची जेजुरी गडाला नऊ लाख पायरी असा घोष करत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करतात. पारंपारीक पद्धतीने कवड्याच्या माळी, लांब हळदीचा मळवट, हातापायावर चाबकाचे फटके मारत वाघ्या मुरळी खंडोबाची सेवा करतात. या वाघ्या मुरळीला पाहण्यासाठी हजारो भाविकांनी मोठी गर्दी केली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;