दक्षिण कोरियात मोठा अपघात, धावपट्टीवरुन विमान घसरले; 23 जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात मोठा अपघात, धावपट्टीवरुन विमान घसरले;  23 जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. रविवारी 175 प्रवासी आणि सहा क्रू सदस्य असलेले विमान धावपट्टीवरून घसरले आणि दक्षिण कोरियाच्या मुआन आंतरराष्ट्रीय विमानतळावर भिंतीवर आदळल्याची दुर्देवी घटना घडली आहे.यानंतर विमानाला आग लागली आहे. योनहॅपच्या प्राथमिक अहवालानुसार, विमान अपघातात सुमारे 23 लोकांचा मृत्यू झाला आहे.आगीची माहिती मिळताच विमानतळावर तैनात असलेल्या अग्निशमन दलाच्या पथकाने धाव घेत आग आटोक्यात आणली. या विमानात सुमारे 181 प्रवासी होते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर रविवारी हा विमान अपघात झाला. जेजू एअरच्या विमानाला आग लागली. हे विमान थायलंडहून परतत होते. लँडिंगच्या वेळी हा अपघात झाला. स्थानिक मीडियाने शेअर केलेल्या छायाचित्रांमध्ये विमान जळताना दिसत आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. अपघात नेमका कशामुळे झाला याचा तपास सुरु आहे. मुआन विमानतळाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;