आतापासूनच फिल्मस्टारसारखं वागतेय राहा; एअरपोर्टवर लेकीच्या कृतीने आलियालाही हसू आवरेना, पापाराझींनीही दिलं भरभरून प्रेम

आतापासूनच फिल्मस्टारसारखं वागतेय राहा; एअरपोर्टवर लेकीच्या कृतीने आलियालाही हसू आवरेना, पापाराझींनीही दिलं भरभरून प्रेम

आलिया भट्ट आणि रणबीर कपूरची जोडी जेवढी प्रसिद्ध असते त्याहीपेक्षा जास्त आता त्यांची लेक राहा जास्त चर्चेत आहे. तिच्या एका झलकसाठी पापाराझीही आतुर असतात. सुरुवातीला पापाराझींना पाहून घाबरणारी राहा आता त्यांच्या चांगलीच ओळखीची झालेली पाहायला मिळते. पापाराझी दिसले की राहा न घाबरता किंवा लाजता थेट त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करते.

राहा आणि पापाराझींची चांगलीच मैत्री झाल्याचे दिसून येते.  पापाराझींना पासून राहा त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करते.  राहा सध्या पापाराझींची आवडती स्टारकिड ठरत आहे.राहा कपूर  राहाचे काही लेटेस्ट व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतायंत, ज्यामध्ये तिच्या कृतीमुळे ती सगळ्याची आवडती झाली. रणबीर-आलियाचे चाहते तर तिचे हे व्हिडिओ पुन्हा पुन्हा पाहत आहेत.

राहाच्या एका कृतीने पापाराझींचे जिंकले तर आलीयालाही कौतुक वाटले

असाच एक राहाचा एअरपोर्टवरचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये अवघ्या दुसऱ्या वर्षाची राहा कपूर विमानतळावर एखाद्या फिल्मस्टारसारखी वागताना दिसली. शुक्रवारी रात्री रणबीर आणि आलिया यांचा एक व्हिडिओ समोर आला आहे. ते राहासोबत नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनसाठी जाताना एअरपोर्टवर दिसून आले. या व्हिडिओमध्ये राहा आलियाच्या कुशीत होती.

हात उंचावून पापाराझींचा निरोप घेतला 

राहा जेव्हा पापाराझींना पाहते तेव्हा तिच्या चेहऱ्यावर आनंद दिसत असून ती लगेच हात उंचावून त्यांना बाय करते आणि जेव्हा पापाराझींनीही तिला ओरडून ‘बाय राहा’ असे म्हटले, तेव्हा तिने मागे वळून पापाराझींना फ्लाइंग किस देताना दिली. राहाची कृती पाहून पाहाराझीही खूश झालेले पाहायला मिळाले. एवढेच नाही तर राहाने केलेलं कृत्य पाहून आलियाला हसू आवरत नव्हते. रणबीरही राहाकडे पाहत हसताना दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

पापाराझी झालेत राहाचे फेव्हरेट 

अलीकडेच ख्रिसमसच्या सेलिब्रेशन निमित्ताने ती आई-वडिलांसोबत पापाराझींसमोर आली होती. पापाराझींच्या आवाजामुळे खरंतर आलिया खूप घाबरली होती की, तिच्या लेकीला याचा त्रास होईल. आलिया उपस्थित असणाऱ्या फोटोग्राफर्सना शांत राहण्यासाठी वारंवार संकेत देत होती. मात्र पुढच्या क्षणी राहा कॅमेऱ्यासमोर आली आणि तिने आत्मविश्वासाने हाय म्हणत सर्वांची मने जिंकली.

राहाचा जन्म 6 नोव्हेंबर 2022 रोजी झाला आणि त्यांनी 2023 मध्ये ख्रिसमसच्या दिवशी सर्वांना तिची पहिली झलक दाखवली होती. राहा जेव्हा पहिल्यांदा कॅमेऱ्यासमोर दिसली तेव्हा ती हुबेहुब आजोबा ऋषी कपूर यांच्यासारखीच दिसत असल्याची चर्चा झाली होती.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;