प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात…”

प्राजक्ता माळीसाठी मनसे नेता धावला, म्हणाले “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात…”

बीडमध्ये वाल्मिक कराड याच्याकडून होणाऱ्या इव्हेंट मॅनेजमेंटची माहिती देताना भाजपचे आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळी, सपना चौधरी आणि रश्मिका मंधाना यांचं नाव घेतलं होतं. त्यामुळे प्राजक्ता माळी संतापली आहे. प्राजक्ताने या प्रकरणी महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता हे प्रकरण तापण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच मनसेचा एक बडा नेता प्राजक्ताच्या समर्थनार्थ धावला आहे. मनसेच्या नेत्याने ट्विट करत सुरेश धस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मनसे नेते अमेय खोपकर यांनी ट्विट करून प्राजक्ता माळीचं समर्थन करतानाच आमदार सुरेश धस यांना कानपिचक्या दिल्या आहेत. “सुरेश धस, तुमच्या गलिच्छ राजकारणात आमच्या कलाक्षेत्रातील माता-भगिनींना ओढू नका. अशाप्रकारे माता-भगिनींची बदनामी करणं हे महाराष्ट्राच्या संस्कृतीला बट्टा लावणारं आहे. अभिनेत्रींवर खोटेनाटे आरोप करुन हलकी प्रसिद्धी मिळवण्याचे हे प्रकार त्वरित थांबलेच पाहिजेत”, असं ट्विट अमेय खोपकर यांनी केलं आहे. त्यामुळे आता हे प्रकरण अधिक तापण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

प्राजक्ता भूमिका मांडणार

दरम्यान, सुरेश धस यांनी ज्या पद्धतीने नावाचा उल्लेख केला, त्या पार्श्वभूमीवर प्राजक्ता माळी आज पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका मांडणार आहे. प्राजक्ता माळीने धस यांच्या विरोधात महिला आयोगाकडे तक्रार करण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे प्राजक्ता आधी महिला आयोगात तक्रार करून पत्रकार परिषद घेणार की पत्रकार परिषदेनंतर तक्रार करणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. तसेच प्राजक्ता काय बोलणार? याकडेही सर्वांचं लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले होते धस?

परळीत इव्हेंट मॅनेजमेंट खूप केलं जातं. वाल्मिकी कराडला या इव्हेंट मॅनजमेंटची मोठी हौस आहे. सपना चौधरी, रश्मिका मंधाना, प्राजक्ता माळी असे इव्हेंट मॅनेजमेंट पॉलिटिक्स ज्यांना करायचे असेल त्यांनी परळीला यावे. त्याचं शिक्षण घ्यावं आणि संपूर्ण देशात त्याच प्रसार करावा, असा उपरोधिक टोला धस यांनी लगावला होता. त्यामुळे प्राजक्ता माळी या संतापल्या असल्याचं सांगितलं जात आहे. तसेच एखाद्या गंभीर प्रकरणाच्यावेळी काहीही संबंध नसताना कलाकारांची नावे घेणं कितपत योग्य आहे? असा सवालही या निमित्ताने केला जात आहे.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;