ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली

ज्युनिअर एनटीआरचा ‘देवरा’ चित्रपट जपानमध्ये प्रदर्शित होणार, तारीखही ठरली

दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीने अवघ्या जगाला भुरळ घातली आहे. दाक्षिणात्य सिनेमांचे चाहते जगभरात आहेत. विशेषतः जपानमध्ये दाक्षिणात्य सिनेमांना अधिक पसंती दर्शवली आहे. ‘आरआरआर’ आणि ‘कल्कि 2898 एडी’ नंतर आता आणखी दाक्षिणात्य सिनेमा जपानमध्ये रिलिज होण्यासाठी सज्ज आहे. ज्युनिअर एनटीआर आणि जान्हवी कपूर यांची मुख्य भूमिका असलेला ‘देवरा: पार्ट 1’ या सिनेमाचा जपानमध्ये प्रिमिअर होणार आहे. सिनेमाच्या प्रदर्शनाची तारीखही घोषित करण्यात आली आहे.

चित्रपटाच्या निर्मात्यांनी एक्स वर एक पोस्ट शेअर केली आहे. ‘देवरा: पार्ट 1’ 28 मार्च 2025 रोजी जपानमधील सिनेमाघरांमध्ये प्रदर्शित होईल, असे निर्मात्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे. 3 जानेवारीपासून चित्रपटाची तिकिट विक्री सुरू होईल. देशात या सिनेमाने फारशी कमाई केली नाही. यामुळे जपानमध्ये चित्रपटाची जादू चालते का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

‘देवरा: पार्ट 1’ 27 सप्टेंबर 2024 रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र देशात हा चित्रपट फारशी गर्दी जमवू शकला नाही. चित्रपटाच्या निर्मितीसाठी 300 कोटी रुपये खर्च आला. मात्र बॉक्स ऑफिसवर चित्रपटाने केवळ 421.63 कोटी इतकीच कमाई केली. यामुळे जपानमध्ये तरी चित्रपट कमाई करणार याची उत्सुकता लागली आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;