आई रवीना टंडनने डोळे दाखवताच अखेर लेकीला करावी लागली ही गोष्ट; व्हिडीओ व्हायरल

आई रवीना टंडनने डोळे दाखवताच अखेर लेकीला करावी लागली ही गोष्ट; व्हिडीओ व्हायरल

अभिनेत्री रविना टंडनची मुलगी राशा थडानी लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. त्यापूर्वीच ती पापाराझी आणि नेटकऱ्यांमध्ये लोकप्रिय ठरतेय. गुरुवारी रात्री रविना आणि राशा या दोघी मायलेकी एकत्र दिसल्या, तेव्हा पापाराझींनी त्यांना फोटोसाठी विचारलं. यावेळी आधी दोघींनी एकत्र फोटोसाठी पोझ दिले, त्यानंतर पापाराझींना राशाला एकटीला पोझ देण्याची विनंती केली. हे ऐकल्यानंतर राशाने नकार दिला. ती आईसोबत गाडीमध्ये बसू लागली, तेव्हाच रविनाने जी प्रतिक्रिया दिली, ते पाहून राशाला अखेर पापाराझींसमोर फोटोसाठी उभंच राहावं लागलं. मायलेकीचा हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून त्यावर नेटकऱ्यांकडून भन्नाट प्रतिक्रिया समोर येत आहेत.

राशाने सोलो फोटोसाठी नकार देताच रविना तिला पुढे जाऊन फोटो क्लिक करण्यास सांगते. मात्र तरीही ती नकार देत आईसोबत गाडीमध्ये बसायला जाते. तेव्हा रविना तिच्याकडे डोळे मोठे करून बघते. आईने डोळे वटारताच क्षणाचाही विलंब न करता राशा फोटोसाठी उभी राहते. पापाराझींनी हा व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला असून तो क्षणार्धात व्हायरल झाला आहे. त्यावर नेटकऱ्यांनी विविध प्रतिक्रियासुद्धा दिल्या आहेत. ‘आईने डोळे दाखवताच बिचारी घाबरली’, असं एकाने म्हटलंय. तर ‘ती तिच्या आईचा खूप आदर करते, म्हणूनच तिने आधी नकार दिला असावा’, असं दुसऱ्याने लिहिलंय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

राशाने नुकतंच तिचं हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आहे. ती 18 वर्षांची आहे. आई रवीनाप्रमाणेच तिचंही चित्रपटसृष्टीत काम करण्याचं स्वप्न आहे. राशा लवकरच अजय देवगणच्या ‘आझाद’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. याच चित्रपटातून राशा आणि अजय देवगणचा पुतण्या अमान देवगण अभिनयक्षेत्रात पहिलं पाऊल ठेवणार आहेत. बुधवारी अजयने या चित्रपटाचा पहिला पोस्टर लाँच केला होता. आझाद या चित्रपटाचं दिग्दर्शन अभिषेक कपूर करतोय. त्याने याआधी ‘रॉक ऑन’, ‘केदारनाथ’, ‘काय पो छे’ यांसारख्या चित्रपटांचं दिग्दर्शन केलंय. यामध्ये राशा आणि अमानसोबतच डायना पेंटी, मोहित मलिक आणि पियुष मिश्रा यांच्याही भूमिका आहेत.

2004 मध्ये रवीनानं अनिल थडानीसोबत लग्न केलं आणि 2005 मध्ये तिनं राशाला जन्म दिला. वयाच्या 21 व्या वर्षी म्हणजे 1995 मध्ये रवीनाने दोन मुलींना दत्तक घेतलं होतं. राशा तिच्या लूक आणि सौंदर्यामुळे नेहमीच नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेते.

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Related Posts

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;