सलमानच्या बर्थडे पार्टीत कथित गर्लफ्रेंडने वेधलं सर्वांचं लक्ष; पहा फोटो
बॉलिवूडचा भाईजान अर्थात अभिनेता सलमान खान आपला 59 वा वाढदिवस साजरा करतोय. बहीण अर्पिता खानने यानिमित्त खास पार्टीचं आयोजन केलं होतं. या पार्टीला बॉलिवूड इंडस्ट्रीतील काही सेलिब्रिटीसुद्धा उपस्थित होते.
वाढदिवसाच्या पार्टीत सलमान खानने अत्यंत स्टाइलमध्ये एण्ट्री केली. या पार्टीला आलेल्या सेलिब्रिटींचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.
सलमानची कथित गर्लफ्रेंड लुलिया वंतूरसुद्धा या पार्टीला पोहोचली होती. लुलिया आणि सलमानचं नातं अनेकदा चर्चेत आलं आहे. काही महिन्यांपूर्वी या दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चा होत्या. मात्र त्यानंतरही लुलियाला अनेकदा सलमान आणि त्याच्या कुटुंबीयांसोबत पाहिलं गेलंय.
About The Author
सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे.




Comment List