करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा

करोडोंची गाडी पंतप्रधानांची, माझी तर मारुती 800 आहे! भाजपच्या मंत्र्यानं सांगितला मनमोहन सिंग यांचा साधेपणा

देशाचे माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांचे गुरुवारी रात्री निधन झाले. दिल्लीतील एम्स रुग्णालयात 10 च्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 92 वर्षांचे होते. मनमोहन सिंग 2004 मध्ये देशाचे 14 वे पंतप्रधान बनले आणि 2014 पर्यंत असे सलग 10 वर्ष या पदावर कार्यरत राहिले. ते देशाचे पहिले शिख पंतप्रधान होते. त्यांच्या निधनानंतर केंद्र सरकारने 7 दिवसांचा राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे.

काँग्रेसचा ‘असरदार सरदार’ अशी डॉ. मनमोहन यांची ओळख होती. डॉ. मनमोहन सिंग यांच्या जाण्याने आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला, अशी भावना देशभरातून व्यक्त होत असून त्यांच्या साधेपणाचे किस्सेही ऐकायला मिळत आहेत. असाच एक किस्सा डॉ. मनमोहन सिंग पंतप्रधानपदावर असताना त्यांचा अंगरक्षक राहिलेले माजी आयपीएस अधिकारी व उत्तर प्रदेशचे समाजकल्याण मंत्री असीम अरुण यांनी एक्स (ट्विटर) वर शेअर केला आहे.

असीम अरुण म्हणतात, ‘2004 पासून जवळपास पुढील तीन वर्ष मी त्यांचा अंगरक्षक होतो. पंतप्रधानांना एसपीजी कमांडोंचे सुरक्षा कवच असते आणि त्यातील क्लोज प्रोटेक्शन टीमला लीड करण्याची संधी मला मिळाली होती. एआयजी सीपीटी ही अशी व्यक्ती असते जी कायम पंतप्रधानांसोबत असते. पंतप्रधानांसोबत एकच अंगरक्षक राहू शकत असेल तर एआयजी जीपीटी त्यांच्यासोबत राहतो. अशा परिस्थितीमध्ये डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत सावलीप्रमाणे राहण्याची जबाबदारी माझ्यावर होती.’

‘डॉ. मनमोहन सिंग यांच्याकडे मारुती 800 ही कार होती. पंतप्रधान निवासामध्ये चमचमत्या बीएमडब्ल्यू कारमागे ती उभे होती. डॉ. मनमोहन सिंग मला वारंवार सांगायचे की, असीम मला या गाडीतून (बीएमडब्ल्यू) प्रवास करायला आवडत नाही. माझी गाडी मारुती 800 आहे. त्यावर मी त्यांना समजावून सांगायचो की, सर ही गाडी तुमच्या लक्झरीसाठी नाही. यात सुरक्षेसाठी खास फिचर्स असल्याने एसपीजीने ही गाडी घेतली आहे’, असे असीम अरुण यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले.

आर्थिक सुधारणांचा शिल्पकार हरपला

ते पुढे म्हणतात, ‘पंतप्रधानांच्या गाड्यांचा ताफा जेव्हा कधी मारुती समोरून जायचा तेव्हा डॉ. मनमोहन सिंग तिच्याकडे मन भरून पहायचे. मी मध्यमवर्गीय माणूस असून सामान्य माणसाची काळजी घेणे हे माझे कर्तव्य आहे. करोडोंची कार पंतप्रधानांची असून माझी कार मारुती 800 आहे, या संकल्पाचा पुनरुच्चार ते वारंवार करायचे.’

डॉ. मनमोहन सिंग यांच्या वक्तशीरपणाचा आणि साधेपणाचा माझ्यावर खूप प्रभाव पडला. भेटीच्या वेळा ते कटाक्षाने पाळत आणि कर्मचाऱ्यांसाठीही त्यांनी काही मानसे स्थापित केली होती. त्यांचे दयाळू वागणे सर्वांनाच प्रभावित करत होते. आंतरराष्ट्रीय पाहुणे असो किंवा घरातील कर्मचारी, ते प्रत्येकाशी सौजन्याने वागायचे, असेही असीम अरुण यांनी ‘टाइम्स ऑफ इंडिया‘शी बोलताना सांगितले.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;