यूपी योद्धाजची प्रथमच उपांत्य फेरीत धडक

यूपी योद्धाजची प्रथमच उपांत्य फेरीत धडक

यूपी योद्धाजने पहिल्या एलिमिनेटर लढतीत दोन वेळच्या विजेत्या जयपूर पिंक पँथर्सचा 46-18 असा 28 गुण फरकाने धुक्वा उडवत प्रो-कबड्डी लीगच्या इतिहासात प्रथमच उपांत्य फेरीत धडक दिली. भवानी राजपूत आणि गगन गौडाच्या चौफेर चढाया अन् हितेश, सुमित, महेंद्र सिंग या बचावफळीची तगडी साथ ही यूपी योद्धाजच्या विजयाची वैशिष्ट्ये ठरली. आता उपांत्य लढतीत त्यांच्यापुढे बलाढय़ हरियाणा स्टिलर्सचे कडवे आव्हान असेल.

बालेवाडीतील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या युपी योद्धाज अन् जयपूर पिंक पँथर्स यांच्यातील बाद फेरीची लढत अगदीच एकतर्फी झाली. भवानी राजपूत आणि गगन गौडा यांनी खोलवर चढायांनी आक्रमक सुरुवात केली. त्याचवेळी त्यांचे बचावपटूही पूर्ण क्षमतेने साथ देत होते. यूपीच्या उंचपुऱ्या चढाईपटूंना रोखण्यात जयपूरला अपयश आले. पूर्ण सामन्यात दोन्ही सत्रांत प्रत्येकी दोन लोण असे चार लोण देत यूपीने जयपूर संघाची काsंडी केली. सुरजित सिंगचा अनुभव त्यांच्या मदतीला येऊ शकला नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे जयपूरला केवळ अर्जुन देशवालवर अवलंबून राहावे लागले. मात्र, आज त्याला लयच गवसली नाही. चार चढायांत केवळ दोन गुण मिळविणाऱया अर्जुनला उत्तरार्धात बाहेर बसवण्याचा निर्णय घ्यावा लागला. त्यामुळे मध्यंतरातील 15 गुणांचे दडपण घेऊन उतरलेल्या जयपूर संघाला सामन्यात राहण्याचा मार्गच सापडला नाही. यूपीकडून भवानी राजपूतने 12, तर बचावात हितेश आणि सुमितने अनुक्रमे 6 आणि 5 गुणांची कमाई केली. त्यांना महेंद्र सिंगने चार गुण मिळवत सुरेख साथ केली.

यूपीने चढाईत 11 आणि बचावात 8 गुण मिळवले आणि दोन लोण चढवत मध्यंतरालाच 23-8 अशी मोठी निर्णायक आघाडी मिळवली होती. उत्तरार्धात फार वेगळे चित्र दिसले नाही. उत्तरार्धातील पहिल्या दहा मिनिटांत आणि दुसऱया दहा मिनिटांच्या सुरुवातीलाच लागोपाठ दोन लोण देत यूपीने सामन्याचा निकाल स्पष्ट केला. उत्तरार्धातील अखेरच्या सत्रातील सुरुवात झाली, तेव्हा यूपीची 26 गुणांची मोठी आघाडी होती. त्यामुळे यूपी योद्धाज किती मोठय़ा फरकाने विजय मिळविणार, इतकीच औपचारिकता बाकी राहिली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;