भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी

भाजपला 2244 कोटींची देणगी, ED ची धाड पडलेल्या कंपन्यांकडूनही निधी; निवडणूक आयोगाने उघड केली आकडेवारी

भाजपला 2023-24 या वर्षात 2 हजार 244 कोटी रुपायंची देणगी मिळाली आहे. 2022-23 च्या तुलनेत ही देणगी तिप्पट आहे. दुसरीकडे काँग्रेसला या वर्षात 288.9 कोटी रुपये देणगी मिळाली होती. 2022-23 साली काँग्रेसला 79.9 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती.

निवडणूाक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 2023-24 साली प्रुडेंट इलेक्टोरल ट्रस्टच्या माध्यमातून भाजपला 723.6 कोटी तर काँग्रेसला 156.4 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती. सर्वाधिक देणगी ही मेघा इंजिनीअरिंग इन्फ्रास्ट्रक्चर, सीरम इन्स्टिट्यूट, आर्सेलर मित्तल ग्रुप आणि भारती एअरटेल या कंपन्यांनी दिली आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत भाजपला 212 टक्क्यांनी जास्त देणगी मिळाली आहे. निवडणुकीपूर्वी भाजपला सर्वाधिक देणगी मिळणे ही नवीन बाब नाही. 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी 2018-19 साली भाजपला 742 कोटी रुपयांची देणगी मिळाली होती, तर काँग्रेसला 146.8 कोटी रुपये मिळाले होते. भाजपला इलेक्ट्रोल ट्रस्टच्या माध्यमातून 850 कोटी रुपये मिळालेत. तर 723 कोटी हे प्रुडेंट आणि 127 कोटी हे ट्रायम्फ इलेक्ट्रोल ट्रस्ट तर 17.2 लाख रुपये हे आईंझीगार्टिंग ट्रस्टमधून मिळाले आहेत.

फ्युचर गेमिंग आणि हॉटेस सर्व्हिस कंपनीने भाजपला तीन कोटी रुपयांची देणगी दिली आहे. सांटियागो मार्टिन हा फ्युचर गेमिंगचा मालक असून त्याला भारताचा लॉटरी किंगही म्हटलं जातं. या मार्टिन वर ईडीची धाड पडली असून त्याची मनी लाँडरिंग प्रकरणी चौकशीही सुरू आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;