IRCTC Down – आयआरसीटीसीची साईट महिन्याभरात दुसऱ्यांदा झाली डाऊन, प्रवाशांना फटका

IRCTC Down – आयआरसीटीसीची साईट महिन्याभरात दुसऱ्यांदा झाली डाऊन, प्रवाशांना फटका

इंडियन रेल्वे कॅटरिंग अ‍ॅण्ड टूरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) चे संकेतस्थळ आणि अ‍ॅप सेवा गुरुवारी ठप्प झाली. नाताळ आणि नवीन वर्षाच्या तोंडावर आज सकाळी सेवा ठप्प झाल्याने लाखो रेल्वे प्रवाशांना मोठा फटका बसला आहे. अनेक प्रवाशांनी सोशल मीडियावर तिकीट बुक होत नसल्याची तक्रार केली होती. ऑनलाईन आऊटेजचा मागोवा घेणाऱ्या डाऊन डिटेक्टरनेही साईट ठप्प पडल्याचे सांगितले होते.

आयआरसीटीसीने आतापर्यंत या मोठ्या आऊटेजवर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. आयआरसीटीसी अ‍ॅप उघडल्यानंतर unable to perform action due to maintenance activity असा एरर दिसत होता. आयआरसीटीचत्या साइटवर ‘Sorry!!! Please Try again!!’ चा मेसेज दिसत आहे. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी या आइटेजवर नाराजी व्यक्त केली आहे.

एका युजरने रेल्वे मंत्र्यांना टॅग करत सकाळी 10 वाजता आयआरसीटीसीची साइट क्रॅश होते आणि जेव्हा ही साईट सुरू झाली तेव्हा सर्व तत्काळ तिकीट बुक केली जातात. हा स्कॅम नाही तर काय आहे. तर अन्य एका युजरने लिहीले की, देश चंद्रावर पोहोचला. मात्र, रेल्वे तिकीट बुकिंग अ‍ॅप क्रॅश झाले. तत्काळ बुकिंगला थांबवू शकले नाही. हे 2024 आहे आणि एक स्टेबल सर्व्हर ठेवण्यासाठी काही रॉकेट सायन्स नाही. आयआरसीटीसीची साइट याआधी 9 डिसेंबरलाही तासाभरासाठी ठप्प झाली होती.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;