वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त

वसईच्या लाचखोर वनक्षेत्रपालच्या घरात मोठे घबाड; घराच्या झडतीत 57 तोळे सोने, 1 कोटी 31 लाखांची रोकड जप्त

वसईतील भ्रष्ट वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे याचा फंटर चंद्रकांत पाटील याला लाचलुचपत विभागाने मंगळवारी 10 लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले होते. यानंतर चौरे याच्या घराची झडती घेतली असता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला मोठे घबाड मिळाले. चौरे याच्या घरातून 57 तोळे सोने आणि तब्बल 1 कोटी 31 लाख रुपयांची रोख रक्कम आढळून आली. त्याच्या मालमत्तेची झाडाझडती अजूनही सुरूच असून गैरमार्गाने आणखी बरीच प्रॉपर्टी असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

वसई तालुक्यातील ससूनवघर गावातील सात गुंठे जमिनीच्या प्रकरणात 20 लाख रुपयांच्या लाचेची मागणी केल्याप्रकरणी वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे आणि त्याचा फंटर चंद्रकांत पाटीलसह अन्य एका व्यक्तीविरोधात मांडवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालघर लाचलुचपत विभाग या प्रकरणाचा अधिक तपास करत असून चौरे आणि अन्य आरोपींच्या मालमत्तेची पडताळणी केली जात आहे. वनविभागातील अधिकाऱ्यांचा या प्रकरणातील सहभाग लक्षात घेता वसई-विरारमधील अधिकतर वनक्षेत्र हे चाळमाफियांच्या घशात कशा प्रकारे गेले असतील हे समोर आले आहे. चार वर्षांपूर्वी ही वसईच्या रेंज ऑफिस कार्यालयात अधिकारी दिलीप तोंडे यांनाही 10 लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत विभागाने अटक केली होती.

काय आहे प्रकरण?

एका शेतकऱ्याच्या मालकीची 7 गुंठे जागा वसईतील ससूपाडा येथे आहे. 2005 मध्ये संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाच्या वनविभागाने ही जमीन ताब्यात घेतली होती. जमिनीचा ताबा परत मिळवून देण्यासाठी आणि वरिष्ठ कार्यालयात अनुकूल अहवाल देण्यासाठी परिक्षेत्र अधिकारी संदीप चौरे याने तक्रारदाराकडून 20 लाखांची लाच मागितली होती. चौरे याने आपला फंटर चंद्रकांत पाटील आणि अन्य एका व्यक्तीशी संपर्क साधण्यास तक्रादाराला सांगितले होते. यानंतर संबंधित शेतकऱ्याने पालघर एसीबी कार्यालयात याबाबतची तक्रार दिली होती. तक्रारीत तथ्य आढळल्याने मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून आरोपी चंद्रकांत पाटील याला 10 लाखांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ पकडले होते.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;