सरपंच संतोष देशमुख हत्येतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा! बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोगमधील देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

सरपंच संतोष देशमुख हत्येतील गुन्हेगारांना कठोर शिक्षा करा! बाळासाहेब थोरात यांनी मस्साजोगमधील देशमुख कुटुंबीयांची घेतली भेट

बीड जिल्ह्यातील मस्साजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची झालेली हत्या ही महाराष्ट्राला हादरवणारी घटना आहे. या हत्येमागील सूत्रधाराला कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशी मागणी माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केली.

बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख यांच्या कुटुंबीयांची मस्साजोग येथे जाऊन काँग्रेसच्या राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य बाळासाहेब थोरात यांनी भेट घेतली. यावेळी माजी मंत्री, आमदार अमित देशमुख उपस्थित होते.

थोरात म्हणाले, ‘सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही अत्यंत वेदनादायी आणि संपूर्ण महाराष्ट्राला हादरवणारी आहे. संतोष देशमुख यांच्या हत्येमागील गुन्हेगारांना त्वरित शोधून कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे. बीड जिल्ह्यासह राज्यात दहशत वाढवण्यासाठी कारणीभूत कोण आहे आणि यामागील खरा मास्टरमाइंड कोण आहे, याची सखोल चौकशी व्हायला पाहिजे. गुन्हेगारांना जात-धर्म काही नसून, या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी व्हावी व फास्ट ट्रॅक कोर्टात सुनावणी करून दोषींना कठोर शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. सरपंच देशमुख यांच्या कुटुंबीयांच्या पाठीशी काँग्रेस पक्ष सदैव उभा राहील, असे आश्वासन बाळासाहेब थोरात यांनी दिली.

दरम्यान, परभणी आणि बीड येथील घटना या पुरोगामी महाराष्ट्राच्या इतिहासाला काळिमा फासणाऱ्या आहेत. या दोन्ही ठिकाणच्या गुन्हेगारांना तातडीने अटक करावी व पिढीत कुटुंबांना न्याय द्यावा, अशी मागणी आमदार अमित देशमुख यांनी केली.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;