वाशीत आगडोंब, बांधकाम मजुरांची 200 घरे जळून खाक

वाशीत आगडोंब, बांधकाम मजुरांची 200 घरे जळून खाक

वाशीमधील सिडको गृहनिर्माण प्रकल्पाच्या साईटवर काम करणाऱया मजुरांच्या घरांना बुधवारी रात्री भीषण आग लागली.  या आगीत 200 घरे जळून खाक झाली. अग्निशमन दलाकडून रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते.

वाशी येथील सेक्टर 19 मधील ट्रक टर्मिनल च्या जागेवर सिडकोच्या माध्यमातून आर्थिक दुर्बल घटकांसाठी घरांची उभारणी केली जात आहे. याच प्रकल्पामध्ये काम करणाऱया सुमारे अडीच हजार मजुरांसाठी ठेकेदाराने या ठिकाणी 200 तात्पुरती घरी बांधली आहेत. याच घरांना आज रात्री पावणेदहाच्या सुमारास अचानक आग लागली. क्षणार्धात सर्वच घरे आगीच्या विळख्यात सापडली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दलाने तातडीने घटनास्थळी जाऊन मदतकार्य सुरू केले. रात्री उशिरापर्यंत आग विझवण्याचे काम सुरू होते. या घरांमध्ये काही मजूर अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;