चिमुकल्याच्या अंगावरून गाडी गेली तरी बचावला, चालक फरार

चिमुकल्याच्या अंगावरून गाडी गेली तरी बचावला, चालक फरार

एका सहा वर्षाच्या चिमुकल्यावरून गाडी गेली. सुदैवाने या अपघातात चिमुकला बचावला असून चालक फरार झाला आहे. वसईत ही धक्कादायक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार वसईत राघव चव्हाण हा सहा वर्षांचा मुलगा रस्त्यात खेळत होता. तेव्हा एक ओला चालक तिथून जात असताना त्याने राघववर गाडी घातली. राघवच्या अंगावरून गाडी गेल्यानंतरही हा चालक थांबला नाही तर तिथून पळून गेला. या अपघातात राघव जरी वाचला असला तरी तो गंभीर जखमी झाला होता. राघवच्या पाठीवर 14 आणि कपाळावर 9 टाके पडले असून पायालाही दुखापत झाली आहे. दरम्यान पोलीस या चालकाचा शोध घेत आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;