हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात

हरलीनच्या शतकाने हिंदुस्थानचा मालिका विजय; वेस्ट इंडीजवर केली 115 धावांनी मात

वडोदरा, दि. 24 (वृत्तसंस्था) – हरलीन देओलच्या पहिल्यावहिल्या शतकी खेळीच्या जोरावर हिंदुस्थानी महिला संघाने वेस्ट इंडीजच्या महिलांचा 115 धावांनी पराभव करत तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी विजयी आघाडी घेतली. आता तिसरा आणि अंतिम सामना 27 डिसेंबरला खेळला जाईल.

धावांचा पाऊस पडलेल्या सामन्यात पहिल्या डावात हरलीनने 115 धावांची शतकी खेळी करत हिंदुस्थानला 358 धावांचा डोंगर उभारून दिला. विंडीजच्या महिलांना हे 359 धावांचे आव्हान पेलवलेच नाही. विंडीजची कर्णधार आणि सलामीवीर हेली मॅथ्यूजने 109 चेंडूंत 106 धावांची आक्रमक खेळी करताना संघाच्या विजयासाठी एकाकी झुंज दिली. तिच्या शतकामुळे वेस्ट इंडीजचा डाव 243 पर्यंत पोहचू शकला. तिने शेमेन कॅम्पबेलसह पाचव्या विकेटसाठी केलेल्या 112 धावांची भागी केली.

कॅम्पबेलने 38 धावांची चिवट खेळी केल्यामुळेच विंडीजला दोनशेचा टप्पा गाठता आला. हिंदुस्थानच्या दीप्ती शर्मा आणि टिटास साधू या दोघींनी प्रत्येकी दोन-दोन विकेट टिपल्या तर प्रिया मिश्राने 49 धावांत 3 विकेट मिळवल्या.

19 वर्षांखालील हिंदुस्थानचा संघ जाहीर; महिला वर्ल्डकपची धुरा निकी प्रसादच्या हाती

त्याआधी गेले दोन आठवडे सुपर फॉर्मात असलेल्या स्मृती मानधनाने आजही आपला अर्धशतकी झंझावात कायम राखत सलग सहावे अर्धशतक साजरे केले. तिने गेल्या सहा डावांत 53, 91, 77, 62, 54 आणि 105 अशा खेळय़ा करत आपला जबरदस्त खेळ पेश केला.  तिने प्रतिका रावलसह 110 धावांची सलामी दिली.

त्यानंतर रावल (76) आणि हरलीन देओलने 62 धावांची भर घातली. मग हरलीनन हरमनप्रीत कौरबरोबर 43 तर जेमिमा रॉड्रिग्जबरोबर (52) चौथ्या विकेटसाठी 116 धावांची भागी रचल्यामुळे हिंदुस्थानी संघ 358 धावांपर्यंत मजल मारू शकला. आजच्या प्रचंड धावसंख्येच्या सामन्यात हिंदुस्थानी महिलांनी 43 चौकार आणि 4 षटकार खेचले, तर विंडीजच्या फलंदाजांनीही 32 चौकारांचा हल्ला चढवला.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;