देशभरातील महत्वाच्या घडामोडी

देशभरातील महत्वाच्या घडामोडी

शिवसेना उपनेत्यांचे संघटनात्मक कार्यक्षेत्र जाहीर

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना उपनेत्यांचे संघटनात्मक कार्यक्षेत्र खालीलप्रमाणे जाहीर करण्यात आले आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीला देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे. नितीन देशमुख – कार्यक्षेत्र-जिल्हे अकोला, अमरावती, बुलढाणा.

दादर-पोरबंदर सौराष्ट्र एक्सप्रेसला अपघात

गुजरातमधील सुरत येथील किम स्थानकातून निघताना दादर-पोरबंदर एक्सप्रेसला (19015) आज अपघात झाला. किम स्थानकातून रेल्वे सुटताना प्रवासी नसलेला डबा दुपारी 3.32 वाजता रुळावरून घसरल्याने मोठा आवाज झाल्याचे प्रवाशांनी सांगितले. गाडीचा वेग कमी असल्याने सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. इंजिनाशेजारी जोडलेल्या प्रवासी नसलेल्या कोचची 4 चाके रुळावरून घसरली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून माहिती मिळताच प्रशासन घटनास्थळी दाखल झाले. मग काही वेळातच रेल्वेची सामान्य सेवा सुरळीत झाली, अशी माहिती पश्चिम रेल्वेने ‘एक्स’द्वारे दिली.

जयपूर दुर्घटनेतील आणखी दोघांचा मृत्यू

एलपीजी टँकर स्फोटात गंभीर भाजलेल्या आणखी दोघांचा आज सवाई मानसिंग रुग्णालयात मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा आकडा 15 वर पोहोचला आहे. यात एका माजी आयएएसचाही समावेश आहे. हा अपघात जयपूर-अजमेर महामार्गावर 20 डिसेंबर रोजी पहाटे झाला होता.

चंदिगड महापालिकेत राडा

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल अवमानकारक उद्गार काढणाऱ्या केंद्रीय मंत्री अमित शहा यांच्याविरोधात चंदिगड महापालिकेत प्रचंड संताप व्यक्त करण्यात आला. काँग्रेस, भाजप आणि आम आदमी पार्टीचे नगरसेवक भिडले. त्यांच्यात हाणामारी झाली. काँग्रेस आणि ‘आप’च्या नगरसेवकांनी अमित शहा यांच्याविरोधात प्रस्ताव सादर करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. त्याला भाजपच्या नगरसेवकांनी कडाडून विरोध केला. त्यानंतर झालेल्या वादावादीचे पर्यावसान हाणामारीत झाले.

मणिपूरसह 5 राज्यांचे राज्यपाल बदलले

केंद्र सरकारने आज 5 राज्यांचे राज्यपाल बदलले. माजी केंद्रीय गृह सचिव अजय कुमार भल्ला यांची मणिपूरच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आरीफ मोहम्मद खान बिहारचे नवे राज्यपाल असतील. ते आधी केरळचे राज्यपाल होते. ओदिशाच्या विद्यमान राज्यपालांनी राजीनामा दिल्यानंतर हरी बाबू कंभमपती हे राज्याचे नवे राज्यपाल असतील. तर माजी लष्करप्रमुख विजय कुमार सिंह यांची मिझोरामच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. बिहारचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांना केरळचे राज्यपाल करण्यात आले आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी या नियुक्त्या केल्या आहेत.

Tags:

About The Author

Manisha Thorat- Pisal Picture

सौ. मनिषा-थोरात-पिसाळ गेल्या १२ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ‘‘न्यूज एक्सप्रसे मराठी’’ या पुणे जिल्ह्यातील आघाडीच्या न्यूज पोर्टलच्या कार्यकारी संपादक म्हणून जबाबदारी सांभाळत आहेत. सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि औद्योगिक क्षेत्रातील विविध समाजपयोगी उपक्रमांमध्ये त्यांनी योगदान दिले आहे. 

Post Comment

Comment List

Advertisement

Latest News

खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई खासगी वाहनांवरील ‘पोलिस’ नाव-लोगोवर कारवाई
शहरातील अनेक खासगी दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर ‘पोलिस’ असा मजकूर, पोलिस विभागाशी संबंधित लोगो किंवा विविध चिन्हे लावल्याचे निदर्शनास येत...
चाकण-तळेगाव उद्योगांना मोठा दिलासा
भोसरी येथील विजयदुर्ग 'क' क्षेत्रीय कार्यालयात ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
स्वातंत्र्य दिनानिमित्त भक्ती-शक्ती येथे राष्ट्रभक्तीचा जागर
गुरुवर्य अकॅडमी स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
चऱ्होलीच्या अ‍ॅपेक्स स्कूल अ‍ॅण्ड ज्युनियर कॉलेजमध्ये स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
एसपीजी इंटरनॅशनल पब्लिक स्कूलमध्ये ८० वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा;